शिव जयंती ..

0

अखर्वात  एखादाचं

महापुरुष असामान्य

शिवनेरीचं भाग्यवान

सुख कुठे  नसे अन्य

शिवबासम ना दुजा

कुल छत्रपती  मान्य

राजा करुन शिवाला

रयतचं जाहली धन्य

मेघ  भाराऊन जाती

आनंदे  बरसे पर्जन्य

स्नेहाळ झाली धरती

ये सुख समृद्धी धान्य

समाधान असामान्य

नाचती जन सामान्य

उत्साह येतो  उत्सवा

सोहळा कुठे न अन्य

भगवा  हाती  धरूनि

रक्षणार्थ सज्ज  सैन्य

उपाशी कुणी न निजे

पळवून लाविले दैन्य

मानवा सहित  सुखी

पशू पक्षी प्राणी वन्य

राज्यात शिवरायतव

दु:ख वेदना उरे शून्य 

हेमंत मुसरीफ पुणे.

   9730306996

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here