❂ दिनांक:~ 19 सप्टेंबर 2022 ❂*
* वार ~ सोमवार *
*आजचे पंचाग*
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*भाद्रपद. 19 सप्टेंबर*
*तिथी : कृ. नवमी (सोम)*
*नक्षत्र : आर्द्रा,*
*योग :– व्यतिपात*
*करण : तैतिल*
*सूर्योदय : 06:18, सूर्यास्त : 06:43,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार *
*ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*म्हणी व अर्थ *
*जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति.*
*अर्थ:- जे सत्पुरूष असतात ते जगाच्या कल्याणासाठी कार्य करीत असतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* दिनविशेष *
*या वर्षातील 262 वा दिवस आहे.*
*महत्त्वाच्या घटना *
*१९५२: विनोदी कलाकार चार्ली चैप्लिन यांना अमेरिकेत येण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांच्या विरुद्ध देश विरोधी भावनाला प्रोत्साहन देण्याचा आरोप लावण्यात आला.*
*१९४६: फ्रान्समधील कान्स येथे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह झाला. दुसरे महायुद्ध सुरू असल्यामुळे याला ७ वर्षे ऊशीर झाला. (website)*
*१९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.*
*१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील ’डिस्नेलँड’ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.*
*१९८५: मेक्सिको देशांत झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे सुमारे दहा हजार लोक मृत्युमुखी पडले होते.*
*२०००: भारताच्या करनाम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक पटकावले आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली.*
*२००१: महात्मा गांधींच्या मूल्यांचा ब्रिटनमध्ये प्रसार करणारे कार्यकर्ते व विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना ’जमनालाल बजाज पुरस्कार’ जाहीर*
*२००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला*
*जन्मदिवस / जयंती*
*१८६७: शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले. ते हिन्दी, मराठी, गुजराती भाषांत प्रसिद्ध झाले. यांपैकी काही ग्रंथांचे अनुवाद ऊर्दू, कानडी, सिंधी, तेलगू व इंग्रजीमध्येही झाले. (मृत्यू: ३१ जुलै १९६८)*
*१९११: विल्यम गोल्डिंग – नोबेल पारितोषिकविजेते इंग्लिश लेखक (मृत्यू: १९ जून १९९३)*
*१९१२: भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हीड यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९८९)*
*१९१७: अनंतराव कुलकर्णी – महाराष्ट्रातील पुणे येथे झालेल्या पहिल्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष, उत्तम साहित्यिक प्रकाशक व कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेचे संस्थापक (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८)*
*१९२५: बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार (मृत्यू: २८ जुलै १९८१)*
*१९२७: ज्ञानपीठ पुरस्कार व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्याचे कवी कुँवर नारायण यांचा जन्मदिन.*
*१९५८: लकी अली – गायक, अभिनेता व गीतलेखक*
*१९६५: भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म.*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन.*
*१७२६: खंडो बल्लाळ चिटणीस – छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक (जन्म: ? ? ????)*
*१९२५: इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन यांचे निधन.*
*१९३६: पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: १० ऑगस्ट १८६०)*
*१९६३: सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार (जन्म: ७ एप्रिल १८९१ – ड्युनेडिन, न्यूझीलंड)*
*१९८७: नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एनर गेरहर्देसन यांचे निधन. (जन्म: १० मे १८९७)*
*१९९२: ना. रा. तथा अण्णासाहेब शेंडे – साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष (जन्म: ????)*
*१९९३: दिनशा के. मेहता – निसर्गोपचार तज्ञ, महात्मा गांधींचे आरोग्य सल्लागार व निकटचे सहकारी (जन्म: ? ? ????)*
*२००२: प्रिया तेंडुलकर – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या. ’जन्मलेल्या प्रत्येकासाठी’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. (जन्म: १९ आक्टोबर १९५४)*
*२००४: दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना (जन्म: ५ सप्टेंबर १९२८)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सामान्य ज्ञान *
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*वाळवंटातील जहाज कोणत्या प्राण्याला म्हणतात ?*
*उंट*
*भारताचा मिसाईल मॅन असे कोणाला म्हटले जाते ?*
*डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम*
*भारत देशातील जनगणना दर किती वर्षानी केली जाते?*
*दर १० वर्षांनी*
*लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?*
*दुसरा*
*गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ?*
*त्र्यंबकेश्वर*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* बोधकथा *
*कोरडी सहानभुती*
*एक कोल्हा एका विहिरीत पडला व त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले. तो आपले डोके मोठ्या मुष्कीलीने पाण्याबाहेर ठेवू शकत होता.*
*इतक्यात एक लांडगा त्या ठिकाणी आला व विहिरीत पडलेला कोल्हा पाहून मोठ्या कळवळ्याने त्याला म्हणाला,*
*’अरेरे ! मित्रा तूच का आत पडला आहेस ? तिथे तुला फारच थंडी वाजत असेल, आणि तू पडलास तरी कसा विहिरीत ? तुझी स्थिती पाहून मला फार वाईट वाटतं हे कसं काय झालं ते तरी मला कळू दे.’*
*त्यावर कोल्हा म्हणाला, ‘मित्रा, तू कृपा करून जर एखादी दोरी आत सोडशील तर तुझ्या या शाब्दिक कळकळीपेक्षा ती मला या वेळी अधिक उपयोगी पडेल. विहिरीतून वर येण्यासाठी तू मला मदत कर, म्हणजे मी माझी हकीगत तुला सांगतो.’*
*तात्पर्य :-*
*एखाद्या संबंधाने नुसत्या शब्दांनी खूप कळकळ दाखविण्यापेक्षा त्याला थोडी जरी प्रत्यक्ष मदत केली तरी त्याची किंमत फार मोठी आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
श्री. देशमुख. एस. बी
*सचिव*
*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*
*कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.