अनिल वीर सातारा : जिल्ह्यातील सदैव दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या माण तालुक्यातील लोधवडे सारख्या गावात जन्म ते आज जगभरातील ४५ देशांमध्ये उद्योगाची व्याप्ती.असा आपला जीवनप्रवास आहे.असे उद्योगपती रामदास माने सांगितले. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात, यशस्वी उद्योजक रामदास माने यांनी संस्थेत कौशल्य शिक्षण घेणाऱ्या अध्ययनार्थीना मार्गदर्शन केले.
१९९३ साली मुहूर्तमेढ रोवलेल्या माने ग्रुप ऑफ कंपनीजची सुरूवात कशी झाली ? त्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा येथे घेतलेल्या ज्ञानाचा व कौशल्यांचा कसा उपयोग झाला ? हे सांगताना माने यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.ध्येय, जिद्द, चिकाटी व कौशल्य याच भांडवलावर त्यांनी आपल्या उद्योगाचे अढळ स्थान निर्माण केलेले आहे.भांडवलावर संस्थेतील मुलांनी देखील स्वतःची व देशाची प्रगती साधावी. असेही आवाहन त्यांनी केले. प्राचार्य संजय मांगलेकर यांनी संस्थेच्या यशाचा चढता आलेख आणि त्याला मिळणारी इंडस्ट्रीजची साथ यावर प्रकाशझोत टाकला.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.स्वामी विवेकानंद यांचे देशातील औद्योगिक क्षेत्रात अमूल्य असे योगदान आहे.तत्कालीन उद्योगपती जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंद यांची १८९३ साली जहाजावर झालेली भेट आणि त्यानंतर सर जमशेदजी टाटा यांनी त्यांच्या उत्पादन उद्योगात केलेली वाढ सांगितली.त्यासाठी स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी केलेले सहकार्य यावेळी आवर्जून नमूद करण्यात आले.
कूपर कॉर्पोरेशनचे कॉर्पोरेट हेड तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आयएमसी चेअरमन नितीन देशपांडे अध्यक्षस्थानावरून बोलताना राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची महती सांगितली.सदरच्या कार्यक्रमास मॅनुफॅक्चरींग असोसिएशन ऑफ सातारचे अध्यक्ष संजोग मोहिते,माजी अध्यक्ष राजेंद्र मोहिते,सचिव डी. वाय. पाटील,उद्योजक शिवाजी फडतरे, महिला उद्योजिका सुरक्षा कदम मॅडम,उदय रोकडे, सदानंद देव व उल्हास कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. याकामी,गटनिदेशक रियाझ शेख,धनंजय हेंद्रे,विनायक भिंगारदेवे,अशोक टेके,संदीप साबळे, भगवान जाधव व पांडुरंग बगाडे यांनी अथक असे परिश्रम घेतले.नेताजी दिसले/यांनी आभारप्रदर्शन केले. विजयकुमार शिंदे व शशिकांत सुतार यांनी सूत्रसंचालन केले.