कोपरगाव प्रतिनिधी : येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस्अॅ ण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेजमधील राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे
यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी रक्तदान केलेल्या रयत सेवक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ.एन.पी. पाटील, आरोग्य कर्मचारी सौ. विजया दुशिंग, सौ. मीरा पवार, दीपक जाधव यांच्यासह डॉ. चंद्रभान चौधरी, प्रा. डॉ. बंडेराव तऱ्हाळ,प्रा. डॉ. बी. एम. वाघमोडे, प्रा. एम. के. दिघे यांचे सहकार्य लाभले.यावेळी ४१ रयत सेवक व विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे रक्तदान केले. सदर प्रसंगी महाविद्यालायाचे उपप्राचार्य प्रा. बाबासाहेब शेंडगे,प्रा.डॉ.उज्ज्वला भोर, प्रतिभा रांधवणे, प्रा.किरण पवार, डॉ.प्रमोद चव्हाण, प्रा.सुनील आदिंसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी
विद्यार्थिनी उपस्थित होते.