झाशीच्या राणीच्या विचारानुसार महिलांनी कार्य करावे : आगाशे

0

सातारा : येथील फुटक्या तळ्याजवळ चैतन्य सफ्लायर्स फूडचे उद्घाटन श्री.व सौ.अर्चना सुधीर देशमुख यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

   कर सल्लागार विनायक आगाशे म्हणाले,”इच्छाशक्ती प्रत्येकांनी सांभाळली पाहिजे.तेव्हाच स्वत:बरोबरच समाजाचा विकास होतो. कर्तबगार कुटुंब म्हणून आफळे परिवाराकडे पाहिले जाते.त्यांच्या परिवारातील महिलाही झाशीच्या राणीच्या विचारधारेतील आहेत. नवनवीन रोजगाराच्या संधी निर्माण करून रोजगारही उपलब्ध करून देतात.”

         

शिरीष जंगम म्हणाले, “स्पर्धेच्या युगात  टिकण्यासाठी ग्राहकांना दालन खुली करून दिली पाहिजेत. हंगामानुसार व्यवसाय आफळे परिवार करीत असल्याने नव्या उयोगात भरारी घेतील.समाजात वावरताना प्रत्येकाने आपापली आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे.”

   विनायक आफळे यांनी स्वागत केले. सौरभ आफळे यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास परवेजभाई,अनिल वीर,ऍड.वा हागावकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here