बुलडाणा रिपाई (ए)घाटावरील जिल्हाकार्यकारणी जाहीर

0

बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाची दक्षिण (घाटावरिल) जिल्हा कार्यकारणीची बैठक माननिय नामदार राष्ट्रीयध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिकन्याय राज्यमंत्री भारत सरकार डॅा. रामदास आठवले व रिपाई महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांचे आदेशानुसार बैठक आयोजीत बुलडाणा येथे आयोजीत केली होती.या बैठकीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष इंजिनियर भाई शरद खरात होते. यावेळी रिपाई घाटावरील (दक्षिण) कार्यकारणी जाहीर करण्यात आली. जिल्हा कार्यध्यक्षपदी प्रा.मुक्तार पठाण, जिल्हाउपध्यक्षपदी इंजिनियर राजेश सरकटे, जिल्हासंघटक डॅा.बबन परमेश्वर, जिल्हा सचिव ग. ग. इंगळे, जिल्हाउपाध्यक्षपदी दत्ता पाटिल राहाने, अल्पसंख्य जिल्हा आघाडी प्रमुखपदी नबाब मिर्झा बेग, बुलडाणा तालुकाध्यक्षपदी केशवराव सरकटे, लोणार तालुकाध्यक्षपदी  समाधान सरदार,चिखली तालुकाध्यक्षपदी हिम्मतराव जाधव, मोताळा तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब अहीरे,देऊळगावराजा तालुकाध्यक्षपदी प्रदीपराव मुख्तदल, सिंदखेडराजा तालुकाध्यक्षपदी रमेश पिंपले, मेहकर तालुकाध्यक्षपदी सुखदेवजी कांबळे या सर्वांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा पुष्पामाला व गुच्छ देऊन सत्कार केला व पूढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

 

या बैठकीत आनेक विषयावर, रिपाईच्या राजकीय भवितव्यावर मुरलीधर गवई, विजय सपकाळ, विजय साबळे, वाघबाई, आशाताई वानखडे, मुक्तार पठाण , हिम्मतराव जाधव, नबाब मिर्झा बेग यांनी विचार मांडले.

   रिपाई जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी बैठकीस संबोधीत करतांना म्हणाले की, रिपाई ही डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार धारेवर चालणारी आहे,ती विचारधार घेऊन आज आपले नेते केंद्रीय सामाजीक न्यायराज्य मंत्री डॅा. रामदास आठवले चालवत आहे. आठवलेंची रिपाई जीकडे जाईल तीकडे सत्ता येते हे आजचे सत्तेचे गणीत आहे. म्हणून आपणांस जर सत्तेत जायचे असेल तर डॅा. रामदास आठवले यांचे विचार खेड्यापाड्यात दिनदलीत वस्तीत जाऊन त्यांच्या कार्या प्रचार प्रसार करून रिपाईची ताकद आपल्या बुलडाणा जिल्ह्यात कसी निर्माण होईल या कडे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्ष देऊन जीव ओतून गाव तीथे शाखा, घर तीथे रिपाई आठवले कर्यकर्ता निर्माण झाला पाहीजे. ही डॅा. बाबासाहेब आंबेडकरांची स्वाभीमानी रिपाई आठवले आता निर्माण करावयाची आहे. असे मौलीक विचार अध्यक्षपदा वरून मांडले. 

   यावेळी जिल्हाभरातून पदाधिकारी सभासद बहुसंखेने उपस्थीत होते. या कार्क्रमाचे सुत्रसंचलन हिम्मतराव जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन युवाजिल्हाध्यक्ष विजय साबळे यांनी केले. राष्ट्रगीताने बैठकीची सागता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here