शिवजयंतीदिनी अनिल वीर समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत होणार !

0

सातारा : शिवजयंती दिनी बुधवार  दि.१९ रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. येथील यशवंत उद्यानमध्ये पुरकार निवडी संदर्भात विश्वरत्न कला मंचची सहविचार सभा संपन्न झाली.तेव्हा वरील औपचारिक निर्णय जाहीर करण्यात आला. अध्यक्षस्थानी मंचचे अध्यक्ष महादेव मोरे होते.

  शाहिर किरण जगताप म्हणाले,”विविध क्षेत्रासह समाजात भरीव काम अनिल वीर करीत आहेत. म्हणूनच आम्ही एकमुखी पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता.त्यावर शिक्कामोर्तब करीत आहे.” यावेळी मंचच्या निवड समितीने  पुरस्कार निवड संदर्भात चर्चा-विनिमय केला. तेव्हा उपस्थितांनी सविस्तर चर्चेत सहभाग नोंदवला. खजिनदार तुकाराम गायकवाड यांनी स्वागत केले.संचालक संतोष मोरे यांनी आभार मानले. सदरच्या सभेस मंचचे पदाधिकारी व संचालक तसेच राष्ट्रोत्सवचे ऍड.विलास वहागावकर आदी मान्यवर-कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here