देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या राहुरी फँक्टरी येथील दोन महिलांसह एका तरुणांस राहुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी एका अल्पवयीन मुलास पळूण आणले होते.व स्थानिक अल्पवयीन मुलांकडून या महिला चोरीचे कामे करुन घेत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलिस सुत्राकडून समजलेली माहिती अशी की,जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटरसायकल, गाड्यांचे टायर व हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या महिला व तरुणांच्या सराईत टोळीला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.या टोळीने चोरी करणाऱ्या साठी एका 16 वर्षीय मुलास पळूण आणले.त्याच्यासह स्थानिक अल्पवयीन मुलांना धमकी देवून या माहिला चोरी करण्यास भाग पाडीत असल्याचे तपासात समोर आले आहे.
राहुरी फँक्टरी येथील रेखा पवार हि या टोळीची म्होरक्या असुन अल्पवयीन मुलांसह तरुणांच्या मदतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत.राहुरी पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत या टोळीने चार गुन्हे केल्याचे उघड झाले असुन या टोळी कडून 4 लाख 25 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहिती नुसार राहुरी फॅक्टरी येथील महिलाही तिच्या साथीदारांसह इतर अल्पवयीन मुलांकडून वेगवेगळ्या जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या केल्याची माहिती मिळाली होती. या महिलेने चोऱ्या करण्यासाठी एका लहान मुलास पळून आणले होते. त्याच्याकडूनही ती बळजबरीने चोऱ्या करून घेत होती. रेखा शरद पवार (वय- 29), विक्रांत संजय ससाने (वय 21),अमिषा सिलीमान सय्यद (वय-21, सर्व रा. प्रसाद नगर, राहुरी फॅक्टरी,ता-राहुरी) यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.या दरम्यान अल्पवयीन सोळा वर्षे मुलास पळून आणल्याचेही निष्पन्न झाले.अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास त्याचे आईचे ताब्यात देण्यात आले. या सर्वांना अटक करून राहुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना चार दिवस पोलीस कस्टडी सुनावली आहे.
पोलिस कोठडी दरम्यान आरोपींकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरलेल्या 5 मोटरसायकली, गाड्यांचे टायर, हॉटेलमधील साहित्य व गुन्ह्यात वापरलेली टाटा मालवाहू गाडी असे एकूण 4 लाख 25 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली,सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते,पो.हे. कॉ. संदिप ठाणगे,विजय नवले, सुरज गायकवाड, पो. कॉ.प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे,नदीम शेख,जयदीप बडे आदींनी केली आहे. पुढील तपास पो. हे.कॉ. संदीप ठाणगे हे करीत आहे.