फोटो- व्हिडीओ करून संशयित आरोपी देत होता धमकी
सातारा : एका दहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून त्याचे फोटो व व्हिडीओ तयार करण्यात आले. हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या घरातल्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
ही घटना सातारा शहरातील एका उपनगरात घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला, तसेच त्याचे फोटो व व्हिडीओ तयार करून कोणाला सांगितलेस तर हे सर्वांना दाखवीन, अशी धमकी पीडित मुलीला संशयित आरोपी देत होता. त्यामुळे मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. हा प्रकार २६ ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ पर्यंत घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक इंगळे या अधिक तपास करीत आहेत.