‘राहुल, औरंगजेबाची औलाद, हराम***, गोळ्या घाला… ठेचून काढा…’: उदयनराजे

0

सातारा : राहुल काय कमी हरामखोर आहे. त्याला औरंगजेबाची औलाद म्हणायला हवी. लोकांनी अशांना ठेचले पाहिजे. मी तर म्हणेल,अशी विकृत विधाने करणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत”, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रातून सुटका होताना लाच दिली होती, असा दावा एका मुलाखतीमध्ये अभिनेता राहुल सोलापूरकर याने केला होता. त्यांच्या या दाव्यावर उदयनराजे भोसले संतापले आहेत.
         राहुल सोलापूरकरचा पोलिस बंदोबस्त काढण्याची मागणी करत उदयनराजे म्हणाले,’बोलताना त्यानी विचार करायला हवा होता. त्याचा पोलिस बंदोबस्त काढायला हवा. लोकांच्या रेटापुढे काय आहे पोलिस बंदोबस्त? पोलिस असे किती आहेत? पुण्याची लोकसंख्या किती आहे? जनतेच्या रेट्यापुढे कोणी टिकणार नाही.’

‘जे अशी विधान करतात ते कोणी असू दे त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे. अशा लोकांच्यामुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. मी देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. जे अशी विधानं करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे.’, असे उदयनराजे म्हणाले.

‘शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. विकृत विधाने करणाऱ्यांना फिल्म इंडस्ट्रीजमधील लोकांनी थारा दिला नाही पाहिजे. या लोकांना गाडले पाहिजे. मी अशा लोकांचा कठोर शब्दात निषेध करतो. मला वाटंत त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे.

राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाला?

एका युट्यूब चॅनलच्या दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल सोलापूरकर म्हणाला, आग्राहून महाराज सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊल आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाजाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली. मैसिन खान किंवा माईन खान त्यांचे आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here