सन २०२७ मधील कुंभमेळ्यातील शाहीस्नान साजरे करण्यासाठी नियोजन करण्यात येणार…
पैठण,दिं.७.(प्रतिनिधी): दक्षिण काशीतील पैठण येथील गोदावरी नदी ही ह्रदयस्थान तथा मुखस्थान म्हणून ओळखली जाते. भगवान ब्रम्हदेव,भगवान रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण अदि देवदेवतांनी ऋषी मुनींनी पवित्र गोदावरीत स्नान केल्याने या गोदावरीचे आगळेवेगळे महत्त्व भाविकात आहे. तीर्थयात्रा करून आल्यावर गोदावरीत स्नान करुनच घरी परतल्याची परंपरा आहे. तसेच चुकुन पाप कृत्य झाल्यास गोदिवरीत स्नान करून त्यातुन मुक्ती मिळते अशी लोक भावना असल्यामुळे पैठणच्या गोदावरीत नियमित स्नानासाठी लोक येतात.
गोमातेच्या(गाईच्या)हत्येतुन पाप मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींच्या तपातुन भगवान शंकराच्या जटातुन त्रिंबकेश्वरातुन गंगा-गोदावरी भु प्रदेशावर माघ शुद्ध दशमी शुभ पर्वावर अवतरली.या गोदावरी मातेचा प्रगट दिन दि.७ शुक्रवारी कृष्ण कमल तिर्थावर भक्तीमय वातावरणात दैनिक गोदावरी तथा विणेकरी भक्त मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी गोदावरीचे जल पुजन हरीभाऊ भुकेले, व ज्ञानोबा मुंढे.यांच्या हस्ते झाले. व पुरोहित विजयकुमार जोशी यांच्या मंत्रघोषात करण्यात आले.
यावेळी गोदावरी महात्म्यावर बंडेराव जोशी व दिनेश पारीख प्रवचन झाले..भक्तांनी गोदावरीवर पुष्पवृष्टी करून महा आरतीने उत्सवाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री बाबासाहेब डोळस,विश्वनाथ गायकवाड, बप्पासाहेब वाघ,केतन देव,सुरेश आंबाडे,दगडु नजन,गणपत जाधव, गणेश खराडकर,सावळाराम लोहकरे,रामनाम बोबडे,बालाजी थोरात, जगन्नाथ शिंदे, सुनील जगताप, परमेश्वर मुंढे, सुदर्शन रुपनर अदिंनी परिश्रम घेतले.
*कुंभमेळा थाटात साजरा होणारा*
मोठे पात्र धारण करून देशातील महा नदी म्हणून गोदावरी परिचित आहे. सन २००३-२००४, तसेच सन २०१५-२०१६ मध्ये पैठण येथे मोठ्या प्रमाणावर कुंभमेळा शाहीस्नान हा उत्सव साजरा करण्यात आला होता. सन २०२७ मध्ये ही भव्य प्रमाणात कुंभमेळ्यातील शाहीस्नान सोहळे रुढी, परंपरेनुसार पैठण क्षेत्री आयोजित करण्यात येणार असल्याचे श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे व वारकरी संघटनेचे नंदलाल काळे यांनी सांगितले. स्थानिक पाटबंधारे खात्याने गोदावरी पात्रात नेहमीसाठी नियमित पुरेसे व आवश्यक तेवढे पाणी ठेवावे व त्यासाठी पाणी राखून ठेवण्याची दक्षता घ्यावी अशी मागणी वारकरी संघटनेने केली आहे
……………………………………..
गोदावरी मातेचा भाविकांनी जय जयकार करून शहरातील गंगा-गोदावरी मंदिरातील गोदावरी मुर्तीचा महा अभिषेक प्रदिप तथा वेदांत महेशपाठक यांच्या हस्ते पार पडला.२००६ मध्ये गोदावरीच्या महापूराच्या वेळी खलिल धांडे या युवकाने अनेकांचे प्राण वाचविल्यामुळे त्याचाही सत्कार करण्यात आला.