छ्त्रपती संभाजीनगर : – साई कॉलनी,भावसिंपुरा येथे माता रमामाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभा घेण्यात आली.या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाश गायकवाड हे होते.सर्वप्रथम माता रमाई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.या प्रसंगी आरोही गव्हाळे,तनुजा गव्हाळे, प्राची सूर्यवंशी,सोनाक्षी गाडेकर या बालिकांनी माता रमाई यांच्या जीवन कर्तुत्वावर भाषणे केली.
पूजाताई कांबळे यांनी रमाईवर सुमधुर गीत सादर केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रकाश गायकवाड यांनी रमाईच्या त्यागाचा व बाबासाहेबांच्या कर्तुत्वाचा गौरव केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उज्वलकुमार म्हस्के यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल वाहुळ,बाबासाहेब गाडेकर,ऍड.विशाल अवचार,ए.सी.वाहुळ,वासुदेव तायडे,ऍड.शेगोकार,अमित गायकवाड,लताबाई वाहुळ,जयश्री गाडेकर,चंद्रकला वैद्य,दीपाली वाहुळ, सुवर्णा वाहुळ यांनी प्रयत्न केले.