बाबासाहेब दिव्यास
रमाबाई उज्वल वात
प्रकाशमय हो भारत
पती पत्नीची रे साथ…
निळा सूर्य आकाशात
रमाई ओढी संसारात
समाज सेवेत ते मग्न
कष्टतात दिवस रात…
अर्धपोटी लढती दोघे
दारिद्र्याशी दोन हात
वाचवलेल्या पैशात
मित्र पाही पुस्तकात…
देश अवघा घडवला
घराचीजरी वाताहात
संविधान मिळेआम्हां
दुर्लक्ष करी संसारात…
त्याग मूर्ती देई स्फुर्ती
डोई राहो तुझे हात
स्थानतुम्हां काळजात
झुके शीश जुळे हात…
व्यक्ती अशा लाखात
कधी तरी रे घडतात
इतिहास वस्त्रा वरती
हिरे मोती जडतात…
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..