देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या म्हैसगाव, आग्रेवाडी मुळा नदी पत्रात अनोळखी तरुणाचा चेहरा ठेचलेला अवस्थेत असुन हा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. ही घटना आज, शनिवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत राहुरी पोलिस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.
याबाबत सविस्तर माहिती असे की, म्हैसगाव आग्रेवाडी मुळा नदी पात्रामध्ये काही तरुण मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी मासे पकडत असताना त्यांना नदीच्या किनारी एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.
या तरुणांनी आसपासच्या नागरिकांना कळविले. त्यावेळी तेथील एका व्यक्तीने याबाबत पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून संबंधित तरुणाचा मृतदेह पाण्या बाहेर काढुन ताब्यात घेण्यात आला.शवविच्छेदनासाठी राहुरी येथे पाठविण्यात आला आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी केली होती.
मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित तरुण कोण? या तरुणाने चेहरा ठणक हत्याराने चेहरा ठेचला असल्याने ओळख पटविणे अवघड झाले आहे. त्याचा घातपात कोणी व कशासाठी केला हे मात्र समजू शकले नाही.या तरुणाचा खुन करुन मृतदेह पाण्यात फेकून दिला आहे? याबाबत नागरिकांतून तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र मृतदेहाचा चेहरा ठेचलेल्या अवस्थेत असल्याचे दिसत असल्याने त्या तरुणाची ओळख पटणे अवघड झाले आहे.