पाच दिवसांच्या चौकशीनंतर संजीवराजेंच्या घरी नेमकं काय सापडलं?

0

फलटण : सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने मंगळवारी छापा टाकला होता.
त्यानंतर तब्बल पाच दिवस आयकर विभागाडून चौकशी सुरू होती. चौकशी पूर्ण आयकर विभागाचे अधिकारी निंबाळकर यांच्या घरातून बाहेर पडले आहेत. या चौकशीत आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागल्याची माहिती आहे.

संजीवराजे नाईक निंबाळकर हे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत. निंबाळकर यांच्या साताऱ्यासह पुण्यातील निवसस्थानी आयकर विभागाकडून गेले पाच दिवस चौकशी सुरु होती. फलटण येथे आयकर विभागाने संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सुरू केलेली चौकशी अखेर पाचव्या दिवशी संपली. चौकशी संपल्यानंतर अखेर आयकर विभागाचे अधिकारी निंबाळकर यांच्या घरातून बाहेर पडले आहेत.

निंबाळकर कुटुंबीयांवर प्रश्नांची सरबत्ती

आयकर विभागाचे कर्मचारी 5 फेब्रुवारी रोजी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानी, पुण्यातील निवासस्थानी , गोविंद मिल्क डेअरी वर चौकशीसाठी दाखल झाले होते. या चौकशीदरम्यान आयकर विभागाकडून संजीवराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना आयकर प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांच्याजवळील अनेक कागदपात्रांची चौकशी करण्यात आली.

छापेमारी व्यक्तिगत माझ्यावर नव्हती – संजीवराजे

आयकर विभागाची चौकशी संपल्यानंतर संजीवराजे निंबाळकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. चौकशीत आयकर विभागाला काहीही सापडलं नसल्याची माहिती संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. माझ्याकडून काहीही जप्त केलेले नाही. ही छापेमारी व्यक्तिगत माझ्यावर नव्हती, गोविंद मिल्क संदर्भात ही कारवाई होती असे त्यांना सांगितले. दरम्यान संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार होते. परंतु त्यापूर्वी ही कारवाई झाल्याची माहिती आहे.

डेअरी उत्पादने आणि कन्स्ट्रक्शन व्यवसाय

संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं धाड टाकल्यानंतर फलटण शहरात एकच खळबळ उडाली. संजीवराजे नाईक निंबाळकरांचं डेअरी उत्पादनांचा आणि कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते चुलत बंधु आहेत. त्यांच्यावरील आयकर विभागाच्या या छाफ्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. या कारवाईनंतर आयकर विभागाच्या छापेमारीला राजकीय कंगोरे असल्याचीही चर्चा शहरात रंगली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here