आज साताऱ्यात,”सुरमयी शाम” गीत मैफिल रंगणार !

0

अनील वीर सातारा : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था प्रस्तुत “सुरमयी शाम” गीत मैफिल कार्यक्रम येथील दीपलक्ष्मी संस्कृती हॉलमध्ये बुधवार  दि. १२रोजी सायंकाळी ६ वा. आयोजित केला आहे.

                    सदरच्या मैफिलीस प्रमुख पाहुणे म्हणून संध्या चौगुले,काका पाटील, मुकुंद फडके,अनिल वाळिंबे,शिरीष चिटणीस व विनायक भोसले उपस्थित राहणार आहेत. श्वेता जाधव निवेदन करणार आहेत. गीत मैफिलीमध्ये गीतांजली पाटील, कैलास मोहिते, श्वेता जाधव व उर्मिला शर्मा आपापली सुमधुर गीते सातारकर रसिक श्रोत्यांसाठी सादर करणार आहेत. कैलास मोहिते यांची ध्वनी व्यवस्था लाभणार आहे. गीत मैफिलीमध्ये लता मंगेशकर ,आशा भोसले, मुकेश, किशोर कुमार, मोहम्मद रफी व एस्. पी. बालसुब्रम्हण्यम् यांचे सदाबहार नगमे गायले जाणार आहेत.तेव्हा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here