पैठण (प्रतिनिधी): जायकवाडी येथील अमित बबनराव बोधने पाटील यांची अमेरिका येथे मॅग्ना स्टियर सिनीयर लिड अभियंता म्हणून नियुक्ती झाली असून ते जायकवाडी पाटबंधारे विभागाचे सेवा निवृत्त कनिष्ठ अभियंता बबन बोधने यांचे चिरंजीव आहेत.
पैठण येथील आर्य चाणक्य विद्यालय येथे चौथी पर्यंत शिक्षण झाले असून नंतर जवाहर नवोदय विद्यालय कन्नड येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माईर्स एमआयटी पुणे येथून ईएनटीसी पदवी झाल्यानंतर त्याची अमेरिका येथील मॅग्ना स्टियर सिनीयर लिड अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे त्या नियुक्तीचे बबन बोधने,सरोज बोधने, भाऊसाहेब बोधने, कल्याण बोधने, लक्ष्मण बोधने, शिवाजी रोडे, संजय म्हस्के यांनी अभिनंदन केले आहे.