कोपरगाव प्रतिनिधी : हिंदू धर्मामध्ये माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा म्हणजे दांडी पौर्णिमा या दांडी पौर्णिमेला विशेष महत्त्व असते. काल कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे हनुमान मंदिरासमोर वेशी मध्ये ऊस व एरंड यांचा नैसर्गिक परंपरेनुसार दांडा रोवत विधिवत पूजा करण्यात आली. पूजेचा मान गावातील खरे कुटुंबातील व्यक्तींकडे आहे. स्व. गोरखनाथ खरे यांच्यानंतर ही पूजा गेल्या 20 वर्षापासून मनराज खरे करतात. स्वतः प्राथमिक शिक्षक असून देखील गावातील विविध पूजेसाठी ते अग्रभागी असतात.
काल ज्येष्ठ ग्रामस्थ हरिभाऊ जावळे, पांडुरंग जावळे, दिगंबर जावळे, बापूराव जावळे, भिवराज जावळे, लक्ष्मण जावळे अदी ग्रामस्थांनी पूजा विधि मध्ये सक्रिय सहभाग घेतला.
तीळ संक्रांतीला दिवस तीळ तीळ वाढला जातो. तर दांडी पोर्णिमेला उसाच्या दांड्याप्रमाणे दांडा दांडा दिवस वाटतो असे ग्रामीण भागातील जानते व वयोवृद्ध नागरिक सांगतात. आज झपाट्याने वाढत असलेल्या विज्ञान युगात देखील सोनेवाडीत ही परंपरा जोपासत आहे. होळी सणाच्या अगोदर एक महिना गावाच्या वेशी मध्ये दांडा रोवला जातो. बरोबर एक महिन्याने होळी सणाची देखील गावातील विविध नागरिकांच्या हस्ते काल ज्या ठिकाणी दांडा रोवला आहे त्याच ठिकाणी होळी पेटवली जाते.