डोणगाव ग्रामपंचायत सदस्य पदाचा सुरेखा फुले यांनी राजीनामा दिला

0

दलितांचा सर्वागीन विकास डोणगाव मध्ये होत नाही म्हणून सदस्य पदाचा राजीनामा  – सौ. सुरेखा फुले

जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामपंचायत सदस्या सौ. सुरेखा फुले यांनी आपल्या राजीनाम्याचे लेखी पत्र डोणगाव ग्रामपंचायत सरपंचाकडे देत राजीनामा मंजुर करण्याची मागणी केली आहे

दलितांच्या  सर्वागीन विकास कामे व्हावीत या साठी मी माझ्या चार वर्षाच्या कार्य काळात वेळो वेळी प्रयत्न केले तसेच माझ्या मागणी कामातील वाघमारे वस्ती, गायकवाड वस्ती, तसेच आमच्या अस्मीतेचा प्रश्न असणारे बौद्ध विहार यासाठी गावात जागा उपलब्ध करून दिली जात नाही. रमाई घरकुल लाभार्थाना घर मंजुर असून जागे अभावी त्यांचे घरे रखडली आहेत. मग मी जर एवढा पाठपुरावा करून काहीच कामे होत नसतील तर मी पदावर राहून काय फायदा ? यासाठी मी माझ्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत राजीनामा पत्र दिले असून माझा राजीनामा मंजुर करावा. असे जामखेड तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनच्या महिला सदस्या सौ. सुरेखा पोपट फुले यांनी आपल्या निवेदन पत्रातून स्पष्ट केले असून आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत डोणगाव ग्रामपंचायत सरपंच यांना राजीनामा पत्र दाखल करत राजीनामा स्विकारण्याची मागणी केली आहे.

This image has an empty alt attribute; its file name is IMG-20250222-WA0003-1-1.jpg

आधुनिक लहुजी सेनाच्या अहिल्या नगरचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पोपट फुले यांच्या पत्नी सौ.सुरेखा पोपट फुले ह्या जामखेड तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र तीनच्या दलित महिला ग्रामपंचायत सदस्या असुन गेल्या चार वर्षा पासुन त्या काम करत आहेत. मात्र त्यांच्या प्रभागासह गावातील इतर दलित वस्ती आणि दलीतांच्या अपेक्षीत  रमाई घरकुलासाठी पर्यायी जागा तसेच दलीतांच्या बौद्ध विहारासाठी जागा आणि इतर सेवा सुविधा अद्याप झाल्या नसल्याने त्यांचा अपेक्षा भंग होत आहे आणि या सर्व नैराश्यातुन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाचे लेखी पत्र सरपंच ग्रामपंचायत डोणगाव यांना सादर करून राजीनामा स्विकारण्याची मागणी केली आहे तर त्यांच्या सोबत असणाऱ्या दलील महिलांनी आमचे प्रश्न पुर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे . डोणगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ.प्रिंयका यादव यांनी अद्याप राजीनामा पत्रावर काहीच निर्णय न घेतल्याने सौ सुरेखा फुले यांचा राजीनामा अजून मंजूर झाला नसल्याचे समजते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here