कृतीतआणि उक्तीत
नेहमीचं मत भिन्नता
अंतर निरंतर वाढता
उद्विग्न करी खिन्नता…
नारी पुरुष समानता
देई शाब्दिकमान्यता
टाळ्यादेणारे भाषण
बोलण्या खरी धन्यता..
अत्याचारां वृध्दींगती
हिस्त्र पशुत्वी वन्यता
लचके तोडती लांडगे
कुठे हरवी सौजन्यता…
आरक्षण रे आकर्षक
उत्सवी राज मान्यता
आकड्यां अडे घोळ
किती देई प्राधान्यता…
नवनवी योजना मस्त
ओली चिंब पर्जन्यता
कोरडा शुष्क परिसर
कुठे लुप्तते वदान्यता..
सहमती नारी संकल्पे
सारे मान्य सामान्यता
विचारावे प्रश्न मनाला
कृतीतकशी जघन्यता…
स्त्री पुरुष भेद विसरा
जाण सार्थअन्योन्यता
आदिशक्ती रूप कळो
अन्यथा आदि शून्यता…
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
जल्लोष ..
महिलादिना निमित्त
सर्वत्र चाले जल्लोष
महोत्सवांची पर्वणी
उत्साह टिपेलाजोश
इव्हेंट मस्त सजवले
केवढा उथळ संतोष
नारी महत्त्व जाणिले
उच्चारावांतजयघोष
समारंभआयोजनांत
नव उन्मेषी मदहोश
नारीअत्याचार वृध्दी
दबल्यास्वरे आक्रोश
योजनेला नाही निधी
हा असे कुणाचा दोष
अवैध आवेदन घुसले
आत्ता दाखवतो रोष
वाढतचाले बलात्कार
एफआयआरखामोश
दबाव खाकी पुत्रावर
झाकोळला असंतोष
सहजकरती छेडछाड
कसले धाडस सपोश
वात्सल्य सिंधू तटाशी
वासनांधकरे घणघोष
पळ वाटा कायद्याच्या
काळोखसुटेल निर्दोष
दबे मौनस्थ किंकाळी
जिंके सदैव उच्चैर्घोष
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.