भिडेवाड्यात…/सावित्री माय …

0

मुली शिक्षीत व्हाव्या
सोसल्या अनंतकळा
सावित्रीबाई शतधन्य
मुढांनी  दिल्या झळा…

भिडेवाड्यात सजली
पहिलीमहिला शाळा
सुवर्णाक्षरांने खुलला
अवचित काळाफळा….

संघर्ष  रे पराकोटीचा
भीड न घातली छळा
विरोध पडला दुबळा
केला वापर सर्वबळा…

कायदा  कचाट्यातून
वाडा  झाला मोकळा
स्मारक अद्भुत  होता
पाहता येईलं सकळा…

प्रेरणादायी  स्त्रोत हो
जिंकेल  कळि काळा
फुले दांपत्य स्मृतींचा
वास्तूत पसरे  दर्वळा…

शिक्षीत कृतज्ञसमाज
लागला साक्षर  लळा
अभिवादन सावित्रीई
प्रयास फळा  निर्मळा….


 
 सावित्री माय ..

सावित्रीबाई फुलेंचे
सुचरित्रचित्ताकर्षक
संघर्षमयी रेआयुष्य
विचार हृदयस्पर्शक…

ब्राह्मण विधवा मूल
स्वता  घेतले दत्तक
मुलेआपली मानली
सारे अनाथ  बालक…

शिक्षीत केले सस्नेहे
गुणांची होई पालक
शेणराडेचिखलफेके
श्रुढ समाज  मालक…

पहिलीमहिलाशाळा
निर्मीले सार्थशिक्षक
घडवती खरामाणूस
माईसमाजसमीक्षक…

संस्था जनकल्याणा
समाज सत्य शोधक
वेशांना दिला आश्रय
ती सन्मान मार्गदर्शक..

भ्रृण हत्या थांबवली
सतिप्रथेची विरोधक
विधवा पुनर्विवाहात
दृष्टी सुधारणा शोधक…

भुरळ घाले काळाला
गुण माईंचे संमोहक
स्त्रवते मायेचे  निर्झर
जरी झाले छठसतक…

– हेमंत मुसरीफ पुणे


  ९७३०३०६९९६
  www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here