सातारा : सर्वच गोष्टीवर रासायनिक प्रक्रियेमुळे मानवाच्या जीवनशैलीत फरक पडलेला आहे.शिवाय, हृदयविकार, अपघात, नैसर्गिकरित्या मृत्यु होत असतात.तेव्हा धक्काधकीच्या जीवनात प्रत्येक गोष्टीत काळजी घेणे गरजेचे आहे.अशा आशयाचे विचार आदरांजलीपर अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
घोट,ता.पाटण येथील माजी निवृत्त पीएसआय साहेबराव पवार यांचे द्वितीय चिरंजीव कालकथीत सुजित पवार यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम संपन्न झाला.साहेबराव पवारसाहेब अधिकारी होते.तरीही शांत व संयमाने समाजात वावरत आहेत.सेवानिवृत्तीचे जीवन कुटुंब व समाजासाठीच खर्च करीत आहेत.सुजितच्या लग्नाबाबत बोलणी चालू होती.अशा आनंददायी वातावरणात आकस्मिक हृदयविकाराच्या झटक्याने सुजितचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह सर्वत्रच शोककळा पसरली आहे.तरीही पवार कुटुंबीयांनी स्वत:ला सावरून धम्म व समाजासाठी वाटचाल केली पाहिजे.
भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आनंदा भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विधी पार पाडला.सदरच्या कार्यक्रमास मिलिंद कांबळे, भीमराव दाभाडे आबासाहेब भोळे,ऍड.भोळे,ऍड.कांबळे, ऍड.विलास वहागावकर, प्राणलाल माने,सुनिल माने,उत्तम पवार,आत्माराम कांबळे,प्रकाश कांबळे,बाळकृष्ण पवार, भानुदास सावंत,राहुल रोकडे, गौतम माने,प्रकाश काशीळकर, विजय भंडारे, नथुराम रोकडे, आनंदा कांबळे, अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते,मित्र परिवार, नातेवाईक,संपूर्ण पवार परिवार,तारळे भागातील कार्यकर्ते,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.