हुताशनी दुजे दिनी
धुळवडी धुलिवंदन
राख लावी कपाळा
पावित्र्य टिळा चंदन
शिवराळी भाषा पुरे
करे मुग्ध अभिनंदन
होळी जाळी दुर्गुणां
सोडा सारे आक्रंदन
प्रत्येक सणसंस्कृती
करे समाज उद्बोधन
गुण जाणावे सणांचे
सकल पूर्ण संशोधन
खूप देते माते आम्हां
धरणीतवअभिवादन
पर्यावरण करी जतन
उच्छृंखले आच्छादन
रंगपंचमीचाविपर्यास
रे -हास जलसंसाधन
मौज मस्तीस्तव मात्र
वाया अपर्याप्तसाधन
थेंबा थेंबाला व्याकूळ
मग हो आरण्य रूदन
बदलेआता आमुलाग्र
करी अंधप्रवृत्ती मर्दन
कोरडी धुळवड योग्य
स्वतांस करी आवेदन
कालानुरूपी अवधान
माणूसपणाचे निवेदन
चिखलफेक ..
राजकारणी धुळवड
सारखी चिखल फेक
स्वरुपदेतात सत्याचे
बातमीअसूनही फेक
पकडापकड शब्दांत
काही करता उल्लेख
खोदून काढता चुका
भराभरावाढे आलेख
सीसीटीव्ही फिरतात
सतत करता देखरेख
बोंबाबोंब रोजचालते
कधी असह्यअतिरेक
एक पक्ष वंदन करतो
दुसरा घाले अभिषेक
महाषुरूषावरी हक्क
राहिला नाही विवेक
उकरू काढी प्रकरणे
योग्य वेळेवरी एकेक
सुसाट धावतोआरोप
रे गाडीलानसतो ब्रेक
गुप्तशत्रू अतिघातक
कशी कळतं ना मेख
शिमगा नीत साजरा
रे मर्यादेची रेखा रेख
शिंतोडे उडे चारित्र्यां
शोधती कारणेअनेक
बदनाम होऊन जातो
असो नेता किती नेक
— हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996