अनिल वीर सातारा : मंजूर झालेल्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक म्हावशीपेठ,पाटण येथे होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर शनिवार दि.१५ रोजी विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचे शिष्टमंडळ पालकमंत्र्याना भेटणार आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पाटण तालुक्यातील जनतेने धर्मांतरानंतर चळवळ उभी करून बांधले होते.आता ही जुनी इमारत मोडकळीस आली आहे.त्यामुळे बौद्ध समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पालकमंत्री यांच्याकडे स्मारकाच्या नूतनीकरणाची मागणी केली होती.या मागणीला प्रतिसाद देत निधीही मंजूर केला आहे.
शिवाय, सदरच्या इमारतीला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणीही त्यांनी केली होती.त्यामुळे भव्य दिव्य असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्मारक उभं करु. लागणारा निधी कमी पडू देणार नाही. असे आश्वासन पालकमंत्री यांनी देवून इमारतीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्याप्रमाणे आराखडा तयार झाला आहे.म्हणूनच कामास प्रारंभ करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी शनिवार दि.१५ रोजी सकाळी १० वा.कारखाना विश्राम गृह येथे शिष्टमंडळ जाणार आहे.तेव्हा सर्व बहुजन संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा गट-तट न मानता फक्त बाबासाहेबांच्या स्मारकासाठी उपस्थित रहावे.तसेच होणाऱ्या चर्चेनंतर पुढील वाटचालीसाठी रविवार दि.१६ रोजी दुपारी १ वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्वांनी उपस्थित रहावे असेही आवाहन संयोजकांनी केले आहे.