अनिल वीर सातारा : बंधुत्व धम्मरत्न प्रा.रमेश मस्के यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त उंब्रज येथील म.गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सपत्नीक सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला. तद्नंतर जेतवन विहार व सांस्कृतिक भवन अशा विविध ठिकाणी सत्कारायचे आयोजन करण्यात आले होते. उंब्रज येथे रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागीय सहाय्यक विभागीय अधिकारी एन.टी.निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रा.पोपट काटकर, प्रकाश चव्हाण,अजित जाधव, जयंत जाधव,राजवैभव जाधव, प्राचार्य व्ही.एम.कदम,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारिवृंद व अध्ययनार्थी उपस्थीत होते.
गोडोली येथे होमग्राऊंडवर कार्यकर्त्यांच्यावतीने स्नेहभोजनासह प्रा.रमेश मस्के व अरुणा मस्के या दाम्पत्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
येथील मिलिंद हौसिंग सोसायटीच्या सांस्कृतिक भवनमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर व मित्र मंडळाकडूनही मस्के सरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.सुवर्णा विनोद यादव,शाहिर श्रीरंग रणदिवे, ऍड.विजयानंद कांबळे,प्रसाद गायकवाड आदी पदाधिकारी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.