बुलडाणा,(प्रतिनिधी)- महाबोधी महाविहार बौद्धगया येथे अनेक दिवसापासून सुरू असलेल्या बौद्ध भिक्षूंचा आंदोलनाला बुलडाणा तालुक्यातील ग्राम धाड नगरीच्या बौध्द बांधवांनी दि. १६ मार्च ला शांततेच्या मार्गाने रॅली काढून निवेदनाव्दारे पाठिंबा दिला. बीहार राज्या मधील बुध्द गया येथील महाबोधी मंदिर हे बौध्द धर्मिया व्यतीरीक इतर धर्मियाच्या व्यवस्थापन व पूजापाठ हे सर्व कार्यक्रम इतर धर्मीयाच्या अधिपत्या खाली चालू आहे ते सर्व व्यवस्थापन बुध्द धर्मियाच्या ताब्यात द्यावा.
सन 1949 कायदा झालेला रद्द करावा व महाबोधी विहाराचे हक्क व व्यवस्थापन बौद्ध भिक्षु व बौद्ध अनुयायांना द्यावे याकरिता महामहिम राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी बुलढाणा,मा.पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना धाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.
धाड नगरीतून बौध्द अनुयायांनी शांतता रॅली काढली या रॅलीत जेष्ठ उपासक,उपासिका,महिला, तरुण धम्ममित्र,माजी श्रामनेर, बालक,बालिका सहभागी झाले, शांतता रॅलीची सुरुवात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्याळाला हार अर्पण करून सुरुवात झाली,नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक व नंतर पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर स्टेशन डायरी वर असलेले जमदार चव्हाण यांच्याकडे निवेदन देण्यात आले व परत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर आल्या नंतर सरणत्तय गाथा घेऊन सांगता झाली,या निवेदनसाठी व रॅलीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व तरुण धम्म मित्रानी मोलाचे सहकार्य केले.