माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते देण्यात आला
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम :
इचलकरंजी येथील पोलीस मित्र असोसिएशन व वेध फाउंडेशनच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा सन्मान करण्यात आला याच कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योजिका राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनी राजेंद्र पाचारणे यांना मा खासदार निवेदिता माने यांच्या शुभहस्ते सहकार रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले.
अश्विनी पाचारणे यांनी महिला सन्मान सबलीकरणासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. समाजाच्या उन्नतीसाठी अश्विनीताई सतत कार्यरत असतात तरुण आणि तरुणींना उद्योग व्यवसायासाठी चालना देण्या करीत प्रयत्नशील असतात. महिलाबचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असतात. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेकांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांचा व्यवसाय उभारणीसाठी मदत करीत असतात.
व्यासपीठावर इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, डाॅ. भाग्यरेखा पाटील, निलम धनवडे, लेखक संदीप राक्षे हे व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणादायक शब्दांनी कार्यक्रम अधिक भव्य व उत्साहवर्धक झाला. हा संपूर्ण सोहळा नेत्रदीपक ठरला, महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन डाॅ. युवराज मोरे व डाॅ. रजनी शिंदे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सुमधूर असे सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केले होते.