❂ दिनांक :~ 21 नोव्हें 2022 ❂*
* वार ~ सोमवार *
* आजचे पंचाग *
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*कार्तिक. 21 नोव्हेंबर*
*तिथी : कृ. द्वादशी (सोम)*
*नक्षत्र : चित्रा,*
*योग :- आयुष्मान*
*करण : गर*
*सूर्योदय : 06:49, सूर्यास्त : 05:55,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*
सुविचार *
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*
जोपर्यंत आपण कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करत नाही , तोपर्यंत आपल्याला ते काम अशक्यच वाटत असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*म्हणी व अर्थ *
*अती झाले अन आसू आले.*
*अर्थ :-*
*काही गोष्टींचा अतिरेक झाला की त्या त्रासदायक वाटतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* दिनविशेष *
*महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन*
*World Television Day*
*या वर्षातील ३२५ वा दिवस आहे.*
* महत्त्वाच्या घटना *
*१८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.*
*१९११: संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.*
*१९५६: एकमताने आजच्याच दिवशी प्रस्ताव पारित करून शिक्षक दिनाला मान्यता देण्यात आली होती.*
*१९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.*
*१९६३: केरळ येथील थुंबा या प्रक्षेपण केंद्रावरून आजच्याच दिवशी अग्निबाण सोडून भारतीय अंतराळ कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.*
*१९७१: बांगलादेश मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.*
*जन्मदिवस / जयंती*
*१६९४: व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक (मृत्यू: ३० मे १७७८)*
*१८७२: प्रसिध्द राजस्थानी कवी व स्वंतत्रता सेनानी यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.*
*१९१६: परमवीर चक्र प्राप्त भारतीय सैनिक यदुनाथ सिंह यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता.*
*१९२६: प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)*
*१९३३: हिंदी भाषेचे प्रमुख कथाकार ज्ञान रंजन यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.*
*१९४१: गुजरात राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.*
*१९८७: ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू*
*मृत्यू / पुण्यतिथी*
१५१७: सिकंदर शाह लोधी याचे आजच्या दिवशी निधन झाले.*
*१९०८: देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.*
*१९२१: राजनीती चे ज्ञाते व स्वतंत्रता सेनानी अविनाशलिंगम चेट्टीयार यांचे आजच्या दिवशी निधन झाले.*
*१९७०: सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक (१९३०) विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)*
*१९९७: आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.*
*२०१५: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३९)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
सामान्य ज्ञान
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*2025 मध्ये I C C महिला एकदिवसीय विश्वचषक कोणता देश आयोजित करेल?*
भारत*
*जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा करण्यात आला?*
*28 जुलै*
*विचार व्यक्त करण्याचे साधन कशाला म्हणतात?*
*भाषा*
*आयोडीन अभावी कोणता रोग होतो?*
* गलगंड*
*शून्याचा शोध कोणत्या देशात लागला?*
- भारत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
बोधकथा *
*सिंह लाडंगा आणि कोल्हा*
*एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशू रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते. या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास सांगितले की, ‘महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो. त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट-कारस्थान करत असावा असं मला वाटतं. हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्याला बोलावणे पाठवले व त्याला विचारले, ‘काय रे, मी इतका आजारी असूनही तू मला भेटायला आला नाहीस, याचा अर्थ काय ? तेव्हा कोल्ह्याने उत्तर दिले. ‘महाराज, मी आपल्याच करता एखादा चांगलासा वैद्य पहात होतो. कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं लांडग्याचं कातडं पांघरलं असता, हा रोग बरा होईल. सिंहाला ते खरे वाटले व त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले.
*तात्पर्य :-*
*दुसर्याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
आजच्या बातम्या *
*भारत – न्युझीलंड: सूर्यकुमारचं शतक, दीपक हुडाच्या 4 विकेट्स, भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय.*
*राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद; ‘शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का?’ ठाकरे गट आक्रमक; जोडे कसे मारतात हे दाखवून देऊ, संजय राऊतांचा इशारा*
*राज्यात थंडीचा जोर वाढला, विविध जिल्ह्यात तापमानात घट तर परभणीत मोसमातील निचांकी तापमानाची नोंद.*
*मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये विजेचा लखलखाट, मात्र कोळशाच्या खाणी असलेल्या चंद्रपूरसारख्या मागास जिल्ह्याला नरकयातना*
*गोव्यात ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर*
*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,*
*सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*
* देशमुख. एस. बी,* सचिव*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*
*7972808064