तर आम्ही पोलिस चौकी समोरच अवैध धंदे सुरु करणार : सत्यजित कदम

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                  माझ्यावर खुनी हल्ला करण्याचा पुर्वनियोजित कट होता.या हल्ल्या मागे कोणाकोणाचे हाथ आहेत. त्यांची नावे पुराव्यानीशी पोलिसांना देणार आहे.त्याची चौकशी करुन देवळाली प्रवरात अशांतता निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे.देवळाली प्रवरातील वातावरण बिघडविण्याचे काम अवैध धंद्यांनी केले आहे.पोलिसांना अवैध धंदे बंद करता येणार नसतील तर आम्ही पोलिस चौकी समोरच अवैध धंदे सुरु करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिला.

             देवळाली प्रवरा शहरात २६ मार्च रोजी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोरांना काही आपल्यातील लोकांनी खतपाणी घालून ४ एप्रिल रोजी रात्री उशिरा विनयभंग,जातीवाचक, पोक्सो, दरोडा अशा विविध कलमान्वये १९ तरुणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.या संदर्भात देवळाली प्रवरा बाजारतळावर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी माजी नगराध्यक्ष कदम बोलत होते.

               

 राहुरी पोलिसांनी १९ जणावर गुन्हा दाखल करताना कोणतीही शहानिशा केली नाही.त्या दिवशी त्या ठिकाणी एक पोलिस उपनिरीक्षक, दोन पोलिस व दोन होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांसमोर हा प्रकार झाला असता तर त्या पोलिसांना आता पर्यंत निलंबित केले पाहिजे होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्याची शहानिशा केली पाहिजे होती.परंतू पोलिसांनी तसे केले नसल्याने १९ जणा विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.हा गुन्हा आम्ही केलाच नाही.त्यामुळे आम्ही जामिन घेणार नाही असा निर्धार गुन्हा दाखल झालेल्या तरुणांनी केला आहे.

             गावातील अवैध धंदे पोलिस बंद करु शकत नसतील तर आधी आपल्या लोकांनी या अवैध धंद्यावर जायचे बंद करा नाहीतर आम्हाला दांडे हातात घ्यावे लागतील .पोलिसांना अवैध धंदे बंद करता येत नसतील तर आम्हीच पोलिस चौकी समोर अवैध धंदे सुरु करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष कदम यांनी दिला आहे.

           

 कदम पुढे म्हणाले की,गावकऱ्यांनी या १९ तरुणांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. आपल्या गावातील काही नालायकप्रवृत्तीच्या लोकांनी मदत करुन १९ तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मदत केली आहे.गुन्हे दाखल करण्यासाठी कायद्याचा गैरवापर केला गेला आहे.गावातील लेकीबाळी सुरक्षित ठेवायच्या असेल तर सर्वांनी एकञ  येण्याची गरज आहे.हिच वेळ निर्णय घेण्याची आहे.असे कदम यांनी सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,रफीख शेख,प्रशांत मुसमाडे, राजेंद्र चव्हाण, डाँ.संदिप मुसमाडे, संदिप खुरुद, प्रविण देशमुख,शहाजी कदम आदींनी निषेध व्यक्त करुन समाज भावना व्यक्त केल्या.

                यावेळी माजी आ.चंद्रशेखर कदम,अशोक खुरुद,माजी नगराध्यक्ष गोरक्षनाथ मुसमाडे,माजी नगसेवक आण्णासाहेब चोथे,शैलेंद्र कदम,अमोल कदम,भारत शेटे,सचिन ढुस,डाँ.विश्वास पाटील,धोंडीराम मुसमाडे,ज्ञानेश्वर वाणी, अदिनाथ कराळे, दिपक त्रिभुवन, सुभाष पठारे,दत्तात्रय कदम, सावळेराम कदम, सचिन सरोदे,भागवत मुंगसे,दिलीप मुसमाडे,नामदेव चव्हाण, बाजीराव चव्हाण,उत्तम मुसमाडे,प्रभाकर महांकाळ, संतोष चव्हाण,अशोक शेटे,संजय कदम, बाळासाहेब पवार,अजिज शेख,सनी मुथ्था,रविंद्र ढुस याच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here