सातारा/अनिल वीर : जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने सर्व पॅनल प्रमुख तसेच इच्छुक उमेदवार यांच्यासाठी दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. नागठाणे,ता.सातारा येथील वरिष्ठ कॉलेजच्या डाव्या बाजूला बाळासाहेब पवार यांच्या घराशेजारी नागठाणे ता.सातारा येथे उमेदवार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणातील विषय : अर्ज भरण्यापूर्वीची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे विविध परवाने काढण्यासाठी आवश्यक बाबी.कार्यकर्ता ,पोलिंग एजंट ,उमेदवार तसेच समर्थक यांना महत्वाचे प्रशिक्षण. आकर्षक, प्रभावशाली छपाई उदाहरणार्थ निवेदन जाहीरनामा केलेली विकास कामे.उमेदवारांचा दैनंदिन खर्च कसा सादर करावा ?
गावातील मतदारांचा सर्वे सुसंवाद व वक्तृत्वाची पद्धत कशी असावी? अशा अनेक बाबीवर सखोल असे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तेव्हा इच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी रु.२५०/- भरून करावी.असे आवाहन प्रशिक्षक प्रकाश काशीळकर (सूक्ष्म नियोजक निवडणूक प्रक्रिया) यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी ९५०३०१६७६० /९९६०७९६१६१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.