माणूसकी जीवंत असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण.
उरण दि. 20 (विठ्ठल ममताबादे) शामल राधावल्लम दास वय 30 वर्षे, धंदा सेंट्रींगकाम, राहणार – कूलपूरिया, परगणा, पश्चिम बंगाल ही व्यक्ती दिनांक 18/9/2022 रोजी सकाळी अंदाजे 1 च्या सुमारास शिव संतोष आटोपार्ट दुकानाच्या समोर, नवघर ते जेडीएल रोड, नवघर तालुका उरण, जिल्हा रायगड येथे पोलिसांना मृताअवस्थेत सापडली होती. त्याच्याजवळ मेट्रो EDGE स्कूटीचे तुकडे पकडेले होते. त्यामुळे या स्कुटीचा धडक लागल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सदर इसमास जे.एन. पी.टी टाउनशीप हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. शेवटी पोलिसांनी या कामी सदरच्या नातेवाईकांना फोन केला असता पश्चिम बंगाल मध्ये राहणाऱ्या नातेवाईकांनी आम्ही एवढ्या दूर मुंबईला, उरणला येऊ शकत नाही. तूम्हीच सर्व अंत्यविधी उरकून टाका असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.
अत्यसंस्कार उरकून टाका असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितल्याने त्याच्या अंतिम संस्काराचा प्रश्न उभा टाकला होता मात्र, ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उरण शहराध्यक्ष गणेश नलावडे व मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष मंगेश कांबळे यांच्या लक्षात येताच सदर मृत इसमाच्या अंतिम संस्काराची सर्व जबाबदारी गणेश नलावडे व मंगेश कांबळे यांनी सामाजिक बांधिलकीतून स्व खर्चाने उचलली. शामल दास याचे उरण मध्ये अंतिम संस्कार झाले असून या कामी माणुसकीच्या दृष्टी कोनातून गणेश नलावडे व मंगेश कांबळे यांनी संपूर्ण खर्चाचा भार उचलत माणूसकी जपली आहे. गणेश नलावडे व मंगेश कांबळे यांनी जोपासलेल्या माणुसकीचे व कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे