आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांकडून आंदोलन होणार !

0
फोटो - आंदोलनाचे संग्रहित नामुनादाखल चित्र.(छाया-अनिल वीर)

सातारा  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य संरक्षीत स्मारक राज्य शासनाने तातडीने ताब्यात देण्यात यावे.या मागणीसाठी सोमवार दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामोर धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले आहेच. त्याचबरोबर दिवसभरात अनेक संघटनाकडूनही महामानवाबद्धल  अपशब्द वापरणाऱ्या रती – महारथीचा जाहीर निषेध करून आंदोलन छेडण्यात येणार आहेत.

                     सातारा शहरातील सदरबझार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेत असताना ज्या इमारतीत रहात होते. त्या इमारतीचे स्मारकात रुपांतर व्हावे. ही अनेक वर्षाची मागणी आहे.तेव्हा याच अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीतीच्या माध्यमातून सन २००४ पासून सतत पाठपूरावा चालू आहे. कोर्टाचे कारण सांगून ताब्यात घेण्याची प्रक्रीया पुर्ण केली नसल्याने आंबेडकरी अनुयायी यांच्यामध्ये तीवृ स्वरूपाची नाराजी आहे.त्यामुळेच पुन्हा एखदा राज्य शासनाला जाग आणण्यासाठी व राज्य शासनाने राज्याचे अँटर्नीजनरल,राज्याचे विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणी सरकारी वकील यांच्याशी चर्चा करून सदरची केस तातडीने चालवून स्मरक ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी. या मागणीकरीता  आंदोलन आयोजीत केलेले आहे. तरी हा लढा स्मारक समितीपुरतेच नाही. तर हे काम सातारा जिल्ह्यातील आंबेडकरवादी विचारांच्या सर्व अनुयायी यांचे आहे.त्यामुळे सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे.असे आवहान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here