लोकशाहित चार स्तंभ महत्वाचे मानले जाते. कार्यपालिका, विधायक,न्यायपालिका हे भारतीय लोकतंत्राचे तीन स्तंभ आहे त्याच प्रमाणे भारतीय मीडियाला भारतीय लोकतंत्राचा चौथा स्तंभ मानला जातो कारण जेव्हा पहिली तीन स्तंभ हे आपल्या कर्तव्या पासून दूर जातात तेव्हा त्यांना मार्गावर आणण्यासाठी हा चौथा स्तंभ कार्यरत होतो.परंतू सध्या राजकीय नैतिकता घसरली असुन प्रत्येक राजकीय पक्षासह नेत्यांना पञकार दावणीला बांधलेले पाहिजे.आमच्या तालावर पञकारीता चालली पाहिजे.आणि तसे घडत हि आहे.परंतू वास्तव पञकारीता करणारे खरे पञकार आजहि कार्यप्रणालीत आहे.पत्रकारिता करणं गुन्हा आहे का? किमान सत्ताधाऱ्यांना तसं वाटतंय.. चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा जो प्रकार घडला त्याचा प्रत्येक सूज्ञ आणि लोकशाही प्रेमी व्यक्ती निषेधच करील.. मात्र या शाईफेक प्रकरणाचं खापर पत्रकारांवर फोडून त्यांच्यावर अटकेची कारवाई करणं संतापजनक आणि निषेधार्ह आहे.शाई फेकणे आणि पञकाराचा काय संबध पञकाराने फक्त ऑन दी स्पॉट रिपोर्टींगचा व छायचिञण केले.अचुक छायचिञण केल्याचा ना.चंद्रकांत पाटील यांच्या मनात राग होता.त्या रागातूनच सत्तेचा वापर करुन शाई फेकीच्या गुन्ह्यात पञकारास गुंतविण्यात आले.या घटनेचा राज्यातील पञकारांनी निषेध केल्याने व आंदोलन उभारण्याचा इशारा देताच सरकारने नमते धोरण घेत पञकार गोविंद वाकडे यास राञीतून गुन्ह्यातून वगळण्यात आले.पत्रकारिता करणं गुन्हा आहे का? किमान सत्ताधाऱ्यांना तसं वाटतंय..असेच सर्व पञकारांना तरी वाटायला लागले आहे.
शाईफेक प्रकरणाची चौकशी व्हावी त्यास कोणत्याही पञकाराचा विरोध नाही. मात्र आपलं काम करणाऱ्या माध्यमांना नाहक त्रास देऊ नये ते पञकार खपवून घेणार नाही..असा इशारा मराठी पत्रकार परिषदेचेने देताच सरकारने नमते धोरण स्वीकारले. ना.चंद्रकांत पाटील यांनी पञकारा बाबत शंका निर्माण करुन ते म्हणतात की, “शाईफेक प्रकारचं छायांकन एवढं व्यवस्थित कसं केलं गेलं? एवढा अचूक अँगल कसा घेतला गेला? म्हणजे तो पत्रकारच शाईफेक प्रकरणामागचा मास्टरमाईंड आहे.. त्याला अटक झाली नाही तर मी पोलीस स्टेशन समोर उपोषण करतो” एका पञकाराला अटक करण्यासाठी मंञीमंडळातील जेष्ठ मंञी ना.पाटील यांना उपोषण करण्याची धमकी द्यावी लागते हि एक शोकांतिका आहे.ना.पाटील यांना माञ बातमी आणि छायाचित्र टिपणं हे पत्रकारांचं कामच आहे. हेच त्यांना समजले नसावे असे आता सर्वच पञकारांना वाटायला लागले आहे. अचुक छायचिञण केले म्हणून पत्रकारास तुम्ही मास्टर ठरवता?राज्यात अनेक ठिकाणी वेगवळ्या प्रकारे अनेकदा दंगली घडताना, मारामारी, मर्डर होत असताना पत्रकार घटनास्थळावर हजर असतात म्हणजे त्या घटनांमध्ये पत्रकारांचा हात असतो का? ऑन दी स्पॉट रिपोर्टींगचा अर्थ काय? हेच ना.पाटील यांना समजावून सांगावी लागेल की शिकवावी लागेल हा संशोधनाचा विषय असला तरी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न विद्यमान सत्ताधारी मंडळाचा असल्याचा पञकार गोविंद वाकडे यांच्या अटकेने तरी तसे वाटत आहे.परंतू पञकार वाकडे यांच्या पाठीशी पञकारांच्या विविध संघटना उभ्या राहिल्या वाकडे अटकेचा निषेध व्यक्त केला. राज्यभर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी कडून सरकारचा जाहिर निषेध केल्याने सत्ताधारी यांच्या पञकाराच्या अटकेचे प्रकरण अंगलट येणार लक्षात येताच राञीतून पञकारास सोडून देण्याची व्यवस्था करण्यात आली.
ना.पाटील यांनी माञ शाईफेक आंदोलन चांगलेच मनावर घेतलेले दिसते.सरकारवर पञकारास सोडून देण्याची वेळ आल्या नंतर त्याचा राग पोलिसावर काढून पोलिसांचे निलंबन केले.तसेच या घटनेप्रकरणी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर ( गुन्हे शाखा, युनिट २ ), पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे (गुन्हे शाखा), गणेश माने (चिंचवड पोलीस ठाणे), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब मुरलीधर सरोदे (चिंचवड पोलीस ठाणे), दीपक खरात (गुन्हे शाखा), पोलीस हवालदार प्रमोद वेताळ (गुन्हे शाखा), पोलीस नाईक देवा राऊत ( गुन्हे शाखा), पोलीस नाईक सागर अवसरे (गुन्हे शाखा), महिला पोलीस कांचन घवले (चिंचवड पोलीस ठाणे), महिला पोलीस प्रियंका गुजर (मुख्यालय) अशी निलंबित केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
समता सैनिक दलाचे मनोज भास्कर गरबडे (वय ३४, रा. गोकुळ हॉटेलजवळ पिंपरी) यांनी त्यांच्या तोंडावर शाई फेकली. चिंचवड पोलिसांनी त्याला तेथेच पकडून ताब्यात घेतले होते. मनोज गरबडे यांच्यासह त्याचे दोन साथीदार धनंजय भाऊसाहेब इजगज (वय ३९) आणि विजय धर्मा ओव्हाळ (वय ४०, दोघेही रा. आनंदनगर, चिंचवड) यांनाही पोलिसांनी अटक केली होती. धनंजय इजगज हेसुद्धा समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आहेत. विजय ओव्हाळ हे वंचित बहुजन आघाडीचे शहर सचिव असल्याचे आघाडीचे शहर सचिव असल्याचे समोर आले आहे.
या तिघांवर कलम ३०७ सह ३५३, २९४, ५००, ५०१, १२० (ब) ३४ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)/१३५ अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाईफेक केल्यावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंदविणे हा अतिरेक आहे, असे मत वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर आपण या प्रकरणातील खटला मोफत लढवू, असे त्यांनी जाहीर केले.
राजेंद्र उंडे जेष्ठ पञकार मो.989023371 ,9518553242