वाळू माफीयां प्रमाणे लँडमाफियांना महसुलमंञी लगाम घालणार का?

खरेदी – विक्रीचे व्यवहाराची चौकशी केल्यास लँडमाफियांचे पितळ उघडे पडणार!

0

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे 

       राज्याचे महसूलमंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गौण खनिज तथा वाळू उपसा आणि वाळू वाहतुकीचे नवं धोरण आणल्यानं नगर जिल्ह्यातल्या वाळूमाफियांचं एक प्रकारे कंबरडं मोडलं आहे. वाळू माफियांच्या अक्षरशः आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत.त्याच प्रमाणे जिल्ह्यात लँडमाफियांनी उच्छाद मांडला आहे.निबंधकांना हाथी धरुन बोगस खरेदी खताद्वारे खरेदी करुन अनेकांना वेठीस धरण्याचे पाप लँडमाफियांनी केले आहे.प्रत्येक तालुक्यातील निबंधकासह  खरेदी विक्री चा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणल्यास लँडमाफियांना लगाम बसेल महसुल मंञी या नात्याने ना.विखे यांनी गौण खनिज बाबत टोकाचे पाऊल उचलले तसेच लँडमाफियांन बाबत कठोर भुमिका घेतल्यास लँडमाफियांना बळी पडलेल्या नागरीकांना न्याय मिळेल.

                  पालकमंत्री ना. विखे यांच्या नव्या धोरणाचं समाजातील सर्वच स्थारातून स्वागत होत असताना मंत्री विखे यांच्याच महसूल खात्यातल्या खरेदीविक्रीतला अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी ना.विखे यांनी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.ना.विखेंनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर भुमिका घेतली.या भुमिकेमुळे टिकाही झाल्या परंतू  उच्छाद मांडलेल्या वाळू माफियांना लगाम घालणे गरजेचे होते. आज राज्यकर्त्यांनी हिम्मत दाखवली नाही.वाळू माफीयांच्या आडून अधिकारीही गब्बर झाले होते.त्याच प्रमाणे लँडमाफियांचा असाच प्रकार असुन तलाठी, ग्रामसेवक, मुख्याधिकारी, सर्कल यांना हाताशी धरुन गेल्या पाच वर्षांत नगर जिल्ह्यात लँडमाफियांनी  कित्येक संशयास्पद अशा जमीन, मोकळ्या जागेचे संबंधित जागा मालकाला अंधारात ठेवून  संशयास्पद व्यवहार केलेले आहे. हे व्यवहार करत असताना लँडमाफियांनी संबंधित जागामालकाच्या वयाचा दुसरा डमी मालक उभा करुन त्याच्या नावानं बनावट आधारकार्ड तयार करुन घेतली आहेत.हे सर्व व्यवहार करताना खरेदी विक्रीच्या वेळी निबंधकाच्या कानावर घातलेले असल्याने अनेक निबंधक कार्यालयात इतरांचे खरेदी विक्री व्यवहार मागे ठेवून लँडमाफियांचे खरेदी विक्री व्यवहार अग्रक्रमांकाने करुन इतरांच्या निर्दशनास येण्यापुर्वी लँडमाफियांना कार्यालतातून जाण्यास सांगितले जाते. अधिकाऱ्यांचा हिस्सा संध्याकाळी ठराविक ठिकाणी रंगित संगित पार्टी करुन दिला जातो.

             लँडमाफियांना सर्वसाधारणपणे आधारकार्ड तयार करायला शंभर ते दीडशे रुपये खर्च येतो. पण हे असे बनावट आधारकार्ड तयार करुन घेण्यासाठी संबंधितास मोठी रक्कम दिली जाते. विशेष म्हणजे बनावट आधारकार्ड तयार करुन देणारी एक नव्हे अनेक टोळ्या नगर जिल्ह्यात कार्यरत आहेत. या लोकांनी आतापर्यंत किती आणि कशी आधारकार्ड तयार करुन दिली, याचीही सखोल चौकशी करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

            जागेचे मूळ मालक कामानिमित्त बाहेरगावी किंवा परदेशात असतात.तसेच अडानी व गरीबीचा फायदा घेवून अशा जागा मालकांचा शोध घेऊन त्यांच्या जमिनीची आणि जागेची खोटी कागदपत्रं तयार करण्याचं कामं ही टोळी करते आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे एका जागेचे किंवा जमिनीचे अनेकवेळा व्यवहार झालेले आहेत. तसे गुन्हेदेखील नगर जिल्ह्यातल्या अनेक पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

               ना.विखे यांनी  गेल्या पाच वर्षांतले जरी असे खरेदी – विक्रीचे व्यवहार तपासले तर या भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत सरकारला जाता येईल. जागा किंवा जमिनीची बनावट कागदपत्र तयार करुन एवढ्यावरच या टोळ्या थांबत नाहीत. तर मूळ जागा मालकांच्याच वयाची व्यक्ती शोधून त्या व्यक्तीच्या नावानं सर्व बनावट कागदपत्रं तयार केली जातात आणि मूळ मालकाच्या जागी त्याच्या दुसर्‍याच व्यक्तीला जागेचा मूळ मालक दाखविण्यात येवून खरेदी विक्रीचा व्यवहार पुर्ण केला जातो.

                नगर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरु आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी ज्यांचे खायचे वांदे होते, ज्यांना रहायला कच्च घर नव्हतं, या गोरखधंद्याच्या आधारे त्या लोकांनी  करोडो रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमविली आहे. नामांकित कंपन्यांची चार चाकी वाहनं आणि सरकारी परवाना असलेलं पिस्तूल घेऊन ही मंडळी सर्वसामान्यांवर दहशत निर्माण करत आहेत.

                लँडमाफियांच्या टोळ्यांचे राजकीय पुढार्‍यांशीही उठ बस असते. राजकीय पुढार्‍यांच्याच वरदहस्तानं ही मंडळी जागा, जमीन खरेदी – विक्रीचे असे संशयास्पद व्यवहार करत आहेत. अशा लोकांचे सिटी सर्वेच्या कार्यालयातही मोठं ‘वजन’ असतं. या कार्यालयातल्या अधिकार्‍यांसह तलाठी, सर्कल यांच्या खिशातले असल्यासारखं ही मंडळी कायदा पायदळी तुडवण्याचं काम करत आहेत.लँडमाफियांनी केलेले व्यवहार अथवा पाच वर्षातील खरेदी विक्री व्यवहार तपासणीचा निर्णय झाल्यास अनेक 

संशयास्पद व्यवहारांची सखोल माहिती बाहेर येईल या चौकशीतून अजिल्ह्यातील लँडमाफियांच्या  मुसक्या आवळल्या जातील आणि सर्वसामान्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

           पैशांच्या आणि राजकीय पुढार्‍यांच्या वरदहस्ताच्या जोरावर ही मंडळी सर्वसामान्यांच्या हक्काच्या जागांची व जमिनीची परस्पर विक्री करत आहेत. त्यामुळे अशा लोकांची आणि संशयास्पद व्यवहारांची चौकशी करुन लँडमाफियांचं चौकशी होणे गरजेचे आहे.यातुन खरेदी विक्री प्रकरणात लँडमाफियांबरोबर अधिकारीही या प्रकरणात अकडले जाणार आहे.बोगस जमिन विक्रीचे प्रकार उजेडात येतील.महासुल मंञी ना.विखे यांनी वाळू वाहतुकीचे नवे नियम लागू केल्याने वाळू माफीयांचे कंबरडे मोडले त्याच प्रमाणे खरेदी विक्री प्रकरणात चौकशी करुन लँडमाफियांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here