सातारा/अनिल वीर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलेले आहे.त्या संविधानावरच संपूर्ण देश चालत आहे. तरी अनेक महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिलेले आहे. मात्र, त्यांनी केलेल्या त्यागाची कोणतीही तमा न बाळगता चंद्रकांत पाटील महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे की काय ?हा प्रश्न निर्माण होत आहे.
महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी शिक्षणाच्या माध्यमातून सामान्य माणसात शिक्षणाचे बीज पेरलेले आहे. शिक्षणाची क्रांती त्यांनी घडवून आणलेली आहे.त्यामुळे अशा महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेले आहे. त्यामुळे बहुजनांच्या भावना दुखावल्याने संबंधित चंद्रकांत पाटील यांचा तात्काळ पक्षश्रेष्ठींनी राजीनामा घ्यावा. त्यांच्यावर महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कायदेशीररित्या गुन्हा दाखल करावा.याबाबातचे जावली तालुक्याच्यावतीने
निवेदन आरपीआयचे (आं) जिल्हा सचिव किरण बगाडे, जावली तालुकाध्यक्ष अमित साळुंखे, उपाध्यक्ष साहेब विशाल बुचडे, अतुल भिसे, सतीश भिसे, अमोल खुडे, सुरज भिसे, रवींद्र कांबळे,दीपक चव्हाण, संजय कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.