येवला (प्रतिनिधी)
भाजपा नेते बाबासाहेब डमाळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ते सुरेगाव विविध सहकारी संस्था चेअरमनपदी गजानन चव्हाण तर व्हाईस चेअरमन माधवराव गायके यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
सुरेगाव रस्ता विविध सहकारी संस्था निवडणुक या पूर्वीच भाजपाचे बाबासाहेब डमाळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झालेली आहे. सहाय्यक निबंध सहकारी संस्था येवला यांच्या कार्यालयात चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक जाहीर केलेली होती.
चव्हाण व गायके यांच्या निवडीचे स्वागत बाबासाहेब डमाळे पाटील, राजाभाऊ ढमाले,छगन बाबा मगर, कचरू चव्हाण, केशव मगर, देविदास चव्हाण, नानासाहेब आसने, बाबासाहेब पगारे, प्रकाश गायके, हरून शहा, फारुख शहा, दादा गायके, भाऊराव आहेर, अमोल ढमाले, बाबासाहेब भागवत, मनोज कापसे, सचिन पगारे, संतोष आहेर, दिगंबर साबळे, संतोष साबळे, पोपटराव पगारे, सुधाकर ढमाले, शेकू मामा तुपे, गणेश आहेर, अकबर पठाण, रवी आहेर,संदीप गायकवाड,विजय पवार, गणेश चव्हाण, विक्रम मगर, गजानन आहेर, संजय गायकवाड, राजेंद्र पगारे ,कैलास पवार, संजय मगर, कैलास आवटे आदींनी केले असून सहाय्यक निबंधक सहकार पाडवी यांचे नेतृत्वाखाली रवींद्र जाधव व चंद्रकांत वाकचौरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज बघितले.