४५ लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आली निसर्गरम्य स्मशानभूमी संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
स्मशानभूमी म्हटल की, उजाड व भयान वाटणारी जागा, काट्या, कुट्याचा रस्ता, सर्वदूर दुर्गधी, गुडघ्यापर्यत वाढलेले गवत, शोकाकूल कुटुंबिय, नात्या गोत्यातील माणसे, मित्रपरिवार व ग्रांमस्थाना बसण्यासाठी ही जागा नसणे, मोडके – तोडके शेड व त्यातून आटोपले जाणारे अत्यंविधी, असेच चित्र अनेक गावात दिसते. मात्र आश्वी बुद्रुकच्या ग्रामस्थांनी हे वर्षानुवर्षाचे विदारक चित्र आत्मविश्वासाने पालटून दाखवले आहे.आश्वी बुद्रुक येथे अंत्यविधीसाठी दुःखीत अंतकरणाने आलेल्या गावातील ग्रामस्थांना व पाहुण्या रावळ्यांना प्रसन्न वाटावे यासाठी येथील काँग्रेसचे कार्यकर्ते तथा माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक विजयराव हिंगे यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून आश्वी बुद्रुक येथे स्वच्छ, सुदंर, हिरवाईने नटलेली व अंत्यविधीसाठीच्या सर्व सोयी सुविधा निर्माण केलेली स्मशानभूमी पाहून हायसे वाटते व मनोमन आपल्या गावातही अशीच स्मशानभूमी असावी असे येथे आलेल्या पाहुण्या रावंळ्याना वाटल्याशिवाय राहत नाही.
आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीने विविध विकासकामे करत असताना विजयराव हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरपंच, उपसरपंच व सदंस्य यांच्या नेतृत्वाखाली प्रामुख्याने प्रवरानदी तिरावर असलेल्या हिदूं स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा निर्णय काही दिवसापूर्वी घेतला होता. त्यामुळे मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या स्मशानभूमीच्या जागी कॉक्रीटची स्मशानभूमी उभारणीच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. एक एकर विस्तीर्ण अशा परिसराला सरक्षंण भिंत व बंदिस्त जाळी बांधण्याचे काम करण्यात आले. एकाच वेळी दोन जणांवर अंत्यसंस्कार करता येतील अशा दोन भव्य कॉक्रीट स्मशानभूमीचे साचे उभे करण्यात आले असून त्यामध्ये दोन नवीन जळक्या बसवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमी परिसरात रंगरंगोटी, अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरीकाना बसण्यासाठी मोठे शेड बांधण्यात आले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटावे यासाठी रहिमपूर येथील सोमनाथ (गंगा) तात्यासाहेब शिंदे या तरुणाच्या कल्पक बुद्धीतून अगदी मोजमाप घेऊन जागोजागी विविध वृक्ष तसेच फुलाची रोपे बसवण्यात आली आहेत. जुन्या आडाला रंगरंगोटी करुन त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या परिसरात सर्वत्र ब्लॉक बसवण्यात आल्यामुळे चिखल अथवा पाणी साचल्याने डबके होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी अंधार राहू नये म्हणून ठिकठिकाणी रोषणाईची सोय करण्यात आली आहे. ही स्मशानभूमी सुदंर हिरवळीमुळे एक हिरवागार बगीचाच दिसत असून सुबक व सुदंर पध्दतीने बांधण्यात आलेली कमान तसेच दोन्ही बाजूने केलेली फुलाची सजावट येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. धर्मशास्त्रानुसार सर्व सेवा सुविधा या ठिकाणी उभारण्यात आल्यामुळे परिसरातील गावातील नागरीक जाणीवपूर्वक येथील काम बघण्यासाठी येतात आपल्या मोबाईल मध्ये सेल्फी घेतल्याशिवाय राहत नाहीत त्यामुळे ही स्मशानभूमी सेल्फी पॉईंट ठरली आहे.या स्मशानभूमीत कीर्तन व प्रवचणासाठी सुदंर असा कॉक्रीटचा छोटासा गोल मंडप उभारण्यात आला आहे. तसेचं दशक्रिया विधी, आंघोळ, हातपाय धुणे, स्वच्छता गृह यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अंत्यविधी तथा दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरीकाना बसण्यासाठी स्टेडियम प्रमाणे रचना करण्यात आली आहे. त्यामुळे स्मशानभूमीत ईहलोकाचा प्रवास देव लोकाच्या प्रवासाच्या थांब्यावर आल्यानतंर नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, ग्रामस्थं याना प्रसन्न वाटेल यांची पुर्ण काळजी सुशोभिकरणादरम्यान घेण्यात आली आहे.
प्रवरा नदीकाठी आम्रेश्वर महादेव मंदिरालगत स्मशानभूमी असल्याने येतील अदृश्य बघणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे.दरम्यान या स्मशानभूमीच्या कामासाठी काँग्रेसचे वरिष्ठठ नेते तथा माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी २५१५ अंतर्गत घाट बांधण्यासाठी १० लाख, सुशोभिकरणासाठी ७ लाख रुपये असा एकूण १७ लाख रुपये निधी दिला असून केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सुशोभिकरण, बंदिस्त जाळी व इतर कामासाठी १० लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता गृह व इतर सुविधा उभारणीसाठी ३ लाख रुपये निधी देण्यात आला असून १५ व्या वित्त आयोगातून दोन नवीन जळक्यासाठी १२ लाख रुपये तसेच नवीन शेड बांधकामासाठी ३ लाख ७९ हजार रुपये निधी उपलब्ध झाला होता. असा एकूण ४५ लाख रुपये निधी या स्मशानभूमीच्या कामासाठी व सुशोभिकरणासाठी खर्च करण्यात आला असल्याने ही स्मशानभूमी एखाद्या पर्यटन स्थळाप्रमाणे भासत असून येथे अनेक लोक अंत्यविधी नसला तरी गप्पागोष्टी करण्यासाठी आवर्जून येत असतात येथील सर्व कामाचे या परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.