संगमनेर : जन्म मृत्यू कोणाच्या हातात नाही, पण जो माणुस जन्माला आला त्याने या समाजासाठी काय काम केले ते महत्वाचे आहे. दलित, वंचित, उपेक्षितांचे, गोर गरिबांचे व ऊस तोडणी कामगारांचे दैवत तत्कालीन केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथ मुंढे यांचे समाजाप्रती असलेले कार्य आजच्या समाजासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन जय भगवान बाबा वंजारी समाज सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष भारत किसन गिते यांनी केले.
तत्कालीन केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या १२ डिसेंबर या जयंती समारंभ प्रसंगी भारत गिते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक गिते होते. यावेळी राजेंद्र दातीर, बाजीराव गिते,सुर्यभान गिते,भिमाजी रहींज, नामदेव आव्हाड भिमराज गिते, दादा यशवंत दातीर, रमेशशेठ गिते,अशोकराव गिते सह ग्रांमस्थ उपस्थित होते.यावेळी बोलतांना श्री.गिते म्हणाले की स्व. गोपीनाथ मुंढे हे ओबीसी समाजासह सर्वाचे एक चालते बोलते व्यासपीठ होते. त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन काम केले. ऊस तोडणी कामगाराचा मुलगा, दुष्काळी तालुक्यातील एका गरीब घरातील मुलगा गावचा सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार होणे सहज शक्य नाही. यासाठी स्व.मुंडे यांनी अपार कष्ट केले. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या हिताचे निर्णय घेऊन ते पूर्णत्वास नेले ते भगवान बाबाचे निसिम भक्त होते. गोरगरिबांचे, वंचितांचे, ऊस तोडणी कामगारांचे जीवन सुखकर व्हावे व सुधारावे म्हणून स्व.गोपीनाथ मुंडे यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्याचे गिते यांनी यावेळी सांगितले.