पुणे : मातंग साहित्य परिषद,पुणे ह्यांच्या वतीने भारतीय मातंग समाजातील (मांग व त्याच्या पोटजातीतील) , तसेच मातंगेतर समाजातील समकालीन ललित व वैचारिक साहित्यकृतींना प्रोत्साहन म्हणून त्यांच्या प्रकाशित उत्कृष्ट साहित्यकृतींना संपूर्ण भारतीय समाजासाठी लेखणीद्वारे खऱ्या अर्थाने सामाजिक प्रगतीची प्रेरणा निर्माण करणारऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्या वंदनीय महान साहित्यिकांच्या नावाने ‘ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाड्मय पुरस्कार ‘ हे दर वर्षी देण्यात येतात.या पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवण्याबाबतचे निवेदन ,मातंग साहित्य परिषद,पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हे पुरस्कार मराठी,हिंदी,इंग्रजी ह्या तिन्ही भाषांमधील साहित्यकृतींना दिले जातात. ह्या पुरस्कारांचे वितरण पुणे येथे समारंभपूर्वक करण्यात येते. शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्कारांचे स्वरूप आहे
*मातंग समाजातील व मातंगेतर समाजातील साहित्यिकांच्या साहित्यकृतींना दिला जाणाऱ्या या पुरस्कारांसंदर्भातील निकष खालील प्रकारे आहेत.
१.ह्या पुरस्कारांसाठी मागील वर्षातील साहित्यकृतींचा विचार केला जातो.त्यानुसार ह्या वर्षी १ जाने. २०२२ ते ३१ डिसें.२०२२ ह्या वर्षांतील प्रकाशित साहित्यकृती विचारात घेतल्या जातील.
२.दर वर्षी ललित( कथा,काव्य, कादंबरी नाटक, चरित्र,आत्मचरित्र,आत्मकथन, प्रवासवर्णन,ललित लेखसंग्रह, इत्यादी) व वैचारिक ह्या दोन्ही प्रकारच्या साहित्यकृतींना हे पुरस्कार देण्यात येतात.
३. साहित्यकृतीमधून स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय ह्या चतु:सूत्रींच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तनाची जाणीव व्यक्त झालेली असावी.
४. साहित्यकृतीमधून मानवी जीवनाचे समर्थ दर्शन घडविले गेलेले असावे.
५. साहित्यकृतीमधून सार्वकालीन व सार्वजनिक मूल्यांचा आविष्कार झालेला असावा.
६. साहित्यकृतीमुळे मातंग साहित्यप्रवाहाच्या संचितात मोलाची भर पडलेली असावी.तसेच ती मातंग साहित्यप्रवाहाच्या इतिहासात महत्त्वाची ठरलेली असावी.
७.इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान, साहित्यसंशोधन , साहित्यसमीक्षा ह्यांच्यासारख्या वैचारिक क्षेत्रांमध्ये संबंधित वैचारिक साहित्यकृतीमुळे मातंग समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची भर पडलेली असावी.
८.साहित्यकृतीमधून नि:स्पृह वृत्तीने व निर्भयपणे तात्त्विक सत्याचा शोध घेतला गेलेला असावा.
९. मातंगेतर समाजातील साहित्यिकांच्या साहित्यकृती ह्या मातंगऋषी, आद्यक्रांतिगुरू लहुजीवस्ताद साळवे, ज्ञानज्योती मुक्ता साळवे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे , तसेच मातंग समाजातील अन्य महान व्यक्ती ह्यांचे चरित्र ह्या स्वरूपाच्या असाव्यात.
१०.स्वतंत्र ,संपादित , तसेच अनुवादित साहित्यकृती चालतील.
११)पुरस्कारासाठीच्या प्रवेशिकेसाठी कोणतेही शुल्क नाही ………………………………………….
तरी साहित्यकृतीच्या दोन प्रती, अर्ज, साहित्यिकाचा अल्प परिचय आणि पासपोर्टसाईज दोन फोटो हे सर्व २१ जाने. २०२३ ( शनि.) पर्यंत पोहोचतील, अशा बेताने पुढील पत्त्यावर पाठवावे :
डॉ.धनंजय भिसे
संस्थापक/अध्यक्ष, मातंग साहित्य परिषद,
‘निर्मलसावली ‘, सर्व्हे नं.७९/२१,अयोध्यानगरी,कोकणेनगर,पाचपीर चौकाजवळ, काळेवाडी, पिंपरी, पुणे-४११०१७
भ्रमणध्वनी : 9822508492/7972984536