लोकसभा आणि विधानसभा एकत्र, निवडणुकीसाठी तयार राहा – चित्रा वाघ

0

सातारा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावं, अशी सूचना भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.  

सातारा येथील भाजप कार्यालयात महिला पदाधिकारी मेळाव्यात वाघ बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, “आपला पक्ष सर्वांत मोठा आहे. तो आणखी वाढवायचा आहे. पण संख्येने नाही तर लीडरनी. त्यामुळे केवळ हार-तुरे नको तर प्रभावी काम करून दाखवा.”

“भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 16-18 तास काम करतात. राजकारणात शॉर्टकट नसतो. ते शिकण्यासाठी कोणता क्लासही नसतो. राजकारण हे बघूनच शिकायचं असतं, असंही चित्रा वाघ यांनी यावेळी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here