पैठण,दिं.१७: शशिकांत विश्वनाथ तायडे पोलीस उप निरिक्षक यांचे शिक्षण एम ए बी एड झालेले असून जळगाव येथील संस्थेत हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे पाच वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. ते २००४ मध्ये मुंबई पोलीस दलात दाखल झाले. सोलापूर येथे ट्रेनिंग करीत असताना शिक्षण चांगले असल्याने तेथील प्राचार्यांनी तायडे याना ट्रेनिंग मध्ये असतानाच लॉ शिकवण्याची परवानगी दिली. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर २००५ मध्ये त्यांची मुंबईतील ताडदेव पोलिसांच्या मुलांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे तीन वर्ष कोणतेही फी न घेता निशुल्क क्लासेस राबवले . या क्लासेस मधील ११७ मुलं पोलीस भरती झाले आहेत . त्यानंतर २०११ मध्ये एमपीएससी मार्फत पीएसआय नाशिक येथे ट्रेनिंग करत असताना संजय बर्वे यांच्यासोबत नवीन पोलीस मॅन्युअलचे कामकाज केले. आता पावतो औरंगाबाद शहर येथील जीन्सी पोलीस स्टेशन,वाळूज पोलीस स्टेशन सिटी चौक पोलीस स्टेशन, जवाहर नगर पोलिस स्टेशन येथे कामकाज करून सध्या ते औरंगाबाद ग्रामीण येथे वाहतूक शाखेत कार्यरत आहे. आतापर्यंत तायडे यांना जवळपास १०० पेक्षा जास्त रिवार्ड मिळालेले आहेत. तसेच त्यांनी तपास केलेल्या अनेक सेशन कमेंट गुन्ह्यांमध्ये अंडर ट्रायल केसेस चालून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झालेली आहे. टा्फिक च्या नियमाबद्दल ज्युनिअर चार्ली समाजसेवक सुमित पंडित यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात यश आले . तायडे यांची काम करण्याची पद्धत अत्यंत वेगळी असल्या कारणाने ज्या सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावले तेथील नागरिकांनी खाकी तील देव माणूस ही उपमा त्यांना दिली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन.हा पुरस्कार सोहळा सुलक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटि औरंगाबाद मार्फत दिला जाणार आहे.औरंगाबाद येथे मोठ्या थाटात सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक ३०/१२/२०२२ रोजी शुक्रवारी मौलाना आझाद रिसर्च सेंटर टिव्हि सेटर औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. असे नीवड समिती तर्फे पत्राद्वारे समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.ह्या पुरस्काराने शशिकांत तायडे उप पोलीस निरिक्षक यांचे कौतुक होत आहे.