उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली येऊन महाविद्यालयीन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू 

0

संगमनेर : उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला वैष्णवी साहेबराव गुंजाळ (वय १९,रा. लॉ कॉलेजसमोर, निर्मल नगर, गुंजाळवाडी, ता. संगमनेर) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे.             

                       मयत वैष्णवी गुंजाळ ही शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकी वरून घरी जात असताना दुचाकी व उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा शहरातील जुन्या पोस्ट ऑफिस समोर अपघात झाला. या अपघातात वैष्णवीचे डोके चाकाखाली गेल्याने ती जागीच ठार झाली. या घटनेने अमृतवाहिनी महाविद्यालयासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.वैष्णवी ही अमृतवाहिनी इंजीनियरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला होती. अपघात ग्रस्त ट्रॅक्टरला उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या असल्याने अपघात झाल्याचे चालकाच्या लक्षात आले नाही. चुक चालकाची होती, असे घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सांगितले. अपघात होताच ट्रॅक्टर चालक पसार झाला. ट्रॅक्टर व उसाने भरलेल्या दोन्ही ट्रॉल्यावर नंबर नव्हते. अपघातानंतर वैष्णवीला थेट पालिकेच्या कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती तिच्या परिवाराला देण्यात आली. यावेळी रुग्णालयात गर्दी झाली होती. या घटनेने सर्वांचे डोळे पाणावले गेले. काल शनिवारी सकाळी गुंजाळवाडी येथील अमरधाममध्ये तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमृतवाहिनी इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. याप्रकरणी अशोक प्रभाकर गुंजाळ यांच्या फिर्यादी वरून संगमनेर शहर पोलिसांनी फरार ट्रॅक्टर चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.  घटनेचा तपास शहर पोलिस करत असून चालकाचा शोध सुरू  आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here