*दिनांक :~ 19 डिसेंबर 2022* *वार ~ सोमवार*
*आजचे पंचाग*
*मार्गशीर्ष. 19 डिसेंबर*
*तिथी : कृ. एकादशी (सोम)*
*योग :- अतीगंड*
*करण : बव*
*सूर्योदय : 06:59, सूर्यास्त : 05:52,*
*सुविचार*
*संयम हा खूप कडवट असतो, पण त्याच फळ फार गोड असतं.*
*म्हणी व अर्थ*
*चोराच्या मनात चांदणे.*
*अर्थ:- वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटत असते.*
*दिनविशेष*
*या वर्षातील 353 वा दिवस आहे.*
*गोवा मुक्ती दिवस.*
*महत्त्वाच्या घटना*
*१९१९: अमेरिकेमध्ये हवामान संस्थेची स्थापना करण्यात आली.*
*१९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.*
*१९६१: भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय च्या माध्यमाने गोव्याच्या बोर्डर मध्ये प्रवेश केला होता.*
*१९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.*
*१९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन ’फिफा वर्ल्ड कप’ चोरीस गेला.*
*१९९८: अमेरिकेच्या डेनवर मध्ये विश्व विकलांग स्कीइंग मध्ये शील कुमार यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार वितरीत.*
*२००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*
*२००७: ब्लादीमर पुतीन यांना टाईम्स मग्झीन ने पर्सन ऑफ़ द ईयर ने पुरस्कृत केले.* *जन्मदिवस / जयंती*
*१८५२: अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: ९ मे १९३१)*
*१८९४: कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ – १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या. (मृत्यू: २० जानेवारी १९८०)*
*१८९७: अमेरिकेचे मुख्य धर्मोपदेशक मार्टिन लूथर किंग सीनियर यांचा जन्म.*
*१८९९: मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९८४)*
*१९०६: लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (मृत्यू: १० नोव्हेंबर १९८२)*
*१९१९: ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते
*१९३४: प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती*
*१९७४: रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज*
*१९८४: भारतीय चित्रपट अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचा जन्म.*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१८६०: लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६), त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे ३,४०० किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला. (जन्म: २२ एप्रिल १८१२)*
*१९२७: राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक (जन्म: ११ जून १८९७)*
*१९२७: क्रांतिकारक अश्फाक़ुला खान यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९००)*
*१९९७: सोनीचे सहसंस्थापक मासारू इबकू यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०८)*
*१९९७: डॉ. सुरेन्द्र बारलिंगे – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २० जुलै १९१९)*
*२०१४: भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक एस. बालसुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३५)*
*सामान्य ज्ञान*
*कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात?*
*हरितद्रव्य*
*खेडे गावातील कायदा व सुव्यवस्था कोण राखतो?*
*पोलिस पाटील*
*वनस्पती जीवनाचा आभ्यास करणाऱ्या घटकाला शास्त्रीय नाव काय आहे?*
*बॉटनी*
*ययाति ही साहित्य कृती कोणत्या भाषेतील आहे?* *मराठी*
*बॅडमिंटनच्या मैदानाला काय म्हणतात?*
*कोर्ट*
*बोधकथा*
*मुंगी व कोशातला किडा*
*एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.’ यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, ‘अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो.’ इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला.*
*तात्पर्य:-*
*संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.*
*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर*
सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,*सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*
*सौ . सविता देशमुख : उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता . सिन्नर*
*7972808064*