आवरे येथील शाळेत यारी दोस्ती ग्रुप कडून शैक्षणिक खेळाचे साहित्य वाटप

0

उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे गावातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवरे येथे शनिवार दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी यारी दोस्ती ग्रुप उरण पूर्व विभाग कडून शैक्षणिक खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. आजच्या इंटरनेटच्या युगात मुला-मुलींमधे खेळाचे मैदानी खेळाचे प्रमाण खूप कमी होत चालले आहे. त्यामुळे मुला-मुलींचा शारीरिक व मानसिक विकास कमी प्रमाणात होत आहे. हीच आधुनिक काळाची गरज ओळखून मुला-मुलींमधे शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा याकरिता यारी दोस्ती ग्रुप कडून आवरे शाळेत शैक्षणिक खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी मुलांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद होता. साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात यारी दोस्ती ग्रुपचे श्याम गावंड,राकेश म्हात्रे, संदीप पाटील, अनंत वर्तक, समीर वर्तक, रुपेश भगत, दिनेश पाटील  हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात वेळात वेळ काढून आवरेचे सरपंच निराबाई  पाटील ,शिक्षकवृंद, तसेच आवरे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here