सातारा : प्रतापसिंहनगर (खेड),ता. सातारा येथील माजी उपसरपंच ज्येष्ट सामाजीक कार्यकर्ते उत्तम भिकाजी ओव्हाळ यांचे ७५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, सून,३ मुली,जावई व नातवंडे असा परिवार आहे.
त्यांना सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करीत होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या तिकिटावर त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी निवडणुका लढवलेल्या होत्या. प्रतापसिंह नगरच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांची ते चुलते होत. प्रतापसिंह नगरमधील अनेक दुकाने बंद ठेवून त्यांना आदारांजली अर्पण करण्यात आली. शेकडो लोकांच्या उपस्थितीत त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.