सातारा/अनिल वीर : समता सैनिक दलाचे अधिकारी मनोज गरबडे यांनी मंत्र्यावर शाई फेकून निळ्या वादळाची झलक दाखवली होती. त्यांनी नुकतीच चैत्यभुमीवर येऊन बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन केले.तेव्हा विशेष पुज्य भन्तेजी विशुध्दिबोधि यांनी त्यांचे पुष्पसुमनाने स्वागत केले.
चैत्यभुमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनीही निळी टोपी डोक्यात घालून त्यांचा सन्मान केला. यावेळी चैत्यभुमीचे सैनिक सुनिल सोनावणे उपस्थित होते. त्यांना पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत. गरबडे आणि त्यांच्या टीमने मोठ्या धैर्याने केलेल्या कामगिरीबद्धल सर्वत्र आंबेडकर प्रेमीत चैतन्य व समाधानाचे वातावरण पसरले आहे.आंबेडकर अस्मितेबद्धल विरोधकांनी नाद करायचा नाही.अशाच संदेशाची सर्वत्र अभिमानास्पद चर्चा चालु आहे.