सिन्नर : पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील इ.५ वी ते १० वीचे विद्यार्थी गुणवत्ते सोबत पाककला व व्यवहार ज्ञानातही अग्रेसर आहेत प्रत्यक्षात मिसळपाव,इडली सांबर,चुलीवरची भजी खाल्यानंतर मला झालेला मनस्वी आनंद भारावून टाकणारा आहे. मी मिसळपाव खाल्यानंतर विद्यार्थ्यांनी माझ्याकडून त्वरित व्यवहाराप्रमाणे पैसे घेतले व प्रत्यक्षात चुलीवरची भजी खाल्यानंतर ती चव व ती पाककला खूपच उत्कृष्ट मला जाणवली. खरच ग्रामीण भागातील मुले आजही पाककलेत व व्यवहार ज्ञानात खूप पक्की आहेत.
प्रत्यक्ष विद्यालयातील ७५ स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांनी दाखवलेली कला मला भावल्यानंतर चंद्रभान रेवगडे यांनी तीन बॉलमध्ये सर्व ग्लास पाडण्याचे बक्षिसही मिळविले विद्यार्थ्यांना आनंद झाला.
पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात भरविला विद्यार्थ्यांनी खाऊ मेळावा यात इ.५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी स्वयं स्फूर्तीने विविध खाद्यपदार्थ्याचे स्टॉल मांडण्याचे ठरवून चक्क ७५ स्टॉल उभे राहिले.यात इच्छामणी पाववडा,गणेश भजी, संकल्प मिसळपाव,रघु बटाटा वडा,इशा इडली सांबर,मेजवानी पाणीपुरी,मनशांती ओली भेळ,संदेश फरसाण,भाऊची मॅगी,चॉकलेट,कॅटबरी,बिस्कीट पुडा इ.खाद्यपदार्थ याबरोबर रस्सीखेच,पाण्यात नाणी टाकणे,रिंग फेकणे,गाढवाला शेपटी लावणे असे विविध मनोरंजनाच्या खेळांचे मुलांनी आयोजन केले.याबरोबर मुलींनी विविध भाजीपाल्याचे स्टॉल व फळांचे स्टॉल मांडले.
विद्यालयात आनंद मेळाव्याचा उद्देश बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी सांगून विद्यार्थ्यामध्ये व्यापारी वृत्ती जागृत करून व्यवसायाचे कौशल्य त्याचा हेतू याबरोबर गणिती संबोध नफा-तोटा याचे व्यवहारात उपयोजन, वस्तूची मांडणी,देवाण-घेवाणीचे व्यवहार, संभाषण कौशल्य विकसित होते व जीवनात व्यापारी तत्व अंगी कारण्याची गरज विदयार्थी दशेत मिळते.विविध खेळांमधून मनोरंजनाबरोबर ताकतीचा वापर नियोजनबद्धता हे अनुभवयाला मिळते.विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहारात ज्ञान अनुभवले.बाल मनावर पुस्तका सोबतच व्यावहारीक संस्कार होणे खूप महत्वाचे असे सांगितले.विद्यार्थ्यांनी आपण जमविलेल्या नफ्याचा विनियोग शाळेसाठी करणार असल्याचे सांगितले. यावेळी श्री गणपत हरी पालवे म्हणाले कि विद्यार्थी आनंद मेळाव्यातून खरी कमाई या उपक्रमाची अनुभूती करून देतात.प्रत्यक्ष नफा-तोटा याचा अनुभव आपल्या पालकासमवेत कथन करतात खरी कमाई या माध्यमातून आपली शैक्षणिक व सामाजिक प्रगती साधून व्यावसायिक देवाण-घेवाण प्रत्यक्ष अनुभवतात विद्यार्थ्यांचे खेळाचे कौशल्य बघून समाधान व्यक्त केले.विद्यार्थी राज्य पातळी पर्यंत विविध खेळांमध्ये तरबेज असल्याचे बघून त्यांना प्रोत्साहन म्हणून आपले वडील कै.हरी रावबा पालवे यांच्या पुण्यस्मरणार्थ विद्यालयास विद्यार्थ्यांना व्यायाम साहित्य डबल बार व सिंगल बार भेट देण्याचे जाहीर केले. स्वरांजली पाटोळे,अभिराज पाटोळे,पूनम बोगीर,शंतनू पाटोळे,सुजल शिंदे, साहिल नवले,सुयोग रेवगडे,कृष्णा रेवगडे,साई रेवगडे,कृष्णा शिंदे,वेदांत रेवगडे,वैभव पाटोळे,वैभव शिंदे,सोमनाथ गोर्डे,यश आव्हाड, रविंद्र पाटोळे,साहिल पोरजे,आयुष पाटोळे,किरण पाटोळे,श्याम रेवगडे,ईश्वर रेवगडे,रोहन जाधव,नितांशु शिंदे,सार्थक उगले,यश रेवगडे,सुरज रेवगडे,आशिष रेवगडे,अमोल वारघडे,रितेश रेवगडे,दर्शन वारुंगसे,सानिका पाटोळे,अनुष्का शिंदे,भाग्यश्री रेवगडे,पायल रेवगडे,अस्मिता रेवगडे,पूजा पालवे,शब्द रेवगडे,राणी शिंदे,श्रेयस वाघ,ऋतुजा रेवगडे,वैष्णवी बोगीर,संप्रदा पाटोळे,अंकिता रेवगडे,तनुजा रेवगडे,प्रतिक्षा पाटोळे,समीर बोगीर,कार्तिक बोगीर,या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयातील उपशिक्षक टी.के.रेवगडे,संस्थचे अध्यक्ष राहुलजी सोनवणे,उपाध्यक्ष टी.एस. ढोली, सहसचिव अरुण गरगटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी बी.आर. चव्हाण,आर.व्ही.निकम,एस.एम.कोटकर,आर.टी.गिरी, एम.सी.शिंगोटे,श्रीमती एम.एम. शेख,सौ सविता देशमुख,टी.के.रेवगडे, श्रीमती सी.बी. शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस.डी.पाटोळे, आर.एस.ढोली,ए.बी.थोरे हे उपस्थित होते.