राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रावादीचा झेंडा फडकल्याने भाजपाला धक्का             

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                 राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत मतदानाची वाढती टक्केवारी सत्ताधाऱ्यांना घातक ठरली असुन तालुक्यातील  4 ग्रामपंचायती भाजपाच्या तर 4 राष्ट्रावादीच्या 3 ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाड्यांनी झेंडा फडकला आहे.सोनगाव ग्रामपंचायत विखे पाटील यांच्या ताब्यात गेल्या पंधरा वर्षा पासुन आहे.या निवडणूकीत माञ विखे गटाचे दोन स्वतंञ गट आमने सामने निवडणूकीत उतरले.दोन्ही पैकी कोणताही गट निवडून आला तर विखें गटाची सत्ता आबाधित राहणार आहे. भाऊसाहेब अंञे, पाराजी घनवट यांनी सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे.एकंदर राहुरी तालुक्यात भाजपा व राष्ट्रावादीला समान ग्रामपंचायत मिळाल्या आहे.तीन हि स्थानिक आघाड्या राष्ट्रावादीच्या संपर्कातील असल्याने राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायवर राष्ट्रावादीचा झेंडा फडकल्याने भाजपाला धक्का बसला आहे.

            रविवारी 11 ग्रामपंचायतचे मतदान झाले. निवडणूक मोठ्या अतिथटी पार पडली होती. यापैकी ब्राह्मणगाव भांड  सरपंचपदी  सविता राजेंद्र पवार या बिनविरोध निवडून आल्या होत्या. मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता राहुरी तहसील कार्यालयामध्ये मतमोजणीला सुरवात झाली. तहसीलदार फसीउद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत  औटी यांनी या मतमोजणीच्या कामाचे नियोजन केले . यावेळी मतमोजणी शांततेत पार पडली.

          कोल्हार खुर्द व सोनगाव या दोन्ही ग्रामपंचायतीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांमध्येच सरपंच पदासाठी लढत झाली.विखे गटाच्याच अनिता दिगंबर पाटील यांनी कमल भाऊसाहेब लोंढे यांचा पराभव केला .कमल लोंढे या पंचायत समितीच्या सदस्य आहेत .सोनगाव ग्रामपंचायत येथेही नामदार विखे यांच्या नेतृत्वाखालील दोन गटात लढत झाली या ग्रामपंचायती निवडणुकीत अलका सुभाष शिंदे या विखे गटाच्या सरपंच निवडून आल्या .त्यांनी विखे गटाच्या भारतीय अंत्रे यांचा  पराभव केला. या ग्रामपंचायत विखे गटांतर्गत  अल्पमतात असलेल्या पूर्वीच्या गटाला सात जागा मिळाल्या तर त्यावेळी सत्ताधारी असलेल्या गटाला  केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. मानोरी ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या ताराबाई भिमराज वाघ या विजयी झाल्या. त्यांनी जनतेतून निवडून आलेल्या अब्बास शेख दयावान सरपंच यांच्या पत्नी नजमा यांचा पराभव केला .या ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी तिरंगी लढत झाली मानोरी ग्रामपंचायतच्या सदस्यांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांच्या युतीला बहुमत मिळाले.

             ब्राह्मणगाव भांड ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सविता राजेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली होती. याच गटाचे पाच सदस्य बिनविरोध निवडून आलेले होते .आजच्या निवडणुकीत विरोधी गटाचे दोन सदस्य निवडून आले.

         आरडगाव ग्रामपंचायत सत्तांतर होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला .भारतीय जनता पक्षाच्या सुरेखा रवींद्र म्हसे  यांनी स्मिता सुनील मोरे यांचा पराभव केला .या ग्रामपंचायतीत तिरंगी लढत होती .मागील सत्ताधारी पक्षाला दोन जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाच्या गटाचे  नऊ सदस्य निवडून आले .

       कोंढवड ग्रामपंचायत तिरंगी लढतीत अर्जुन पाटील म्हसे विजयी झाले .त्यांनी मधुकर बाबासाहेब म्हसे व मधुकर रामदास म्हसे यांचा पराभव केला. या ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन भाजपला विरोधी गटात बसावे लागले .या गटाचा एक सदस्य निवडून आला .

       ताहाराबाद ग्रामपंचायतीत  सत्तांतर होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नऊ सदस्य निवडून आले तर विरोधकांना दोन जागांवर समाधान मानावे लागले. सरपंच पदाच्या निवडणुकीत तिरंगी लढतीत निवृत्ती विठ्ठल घनदाट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी झाले. 

           मांजरी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लताबाई जालिंदर अंबिटकर या विजयी झाल्या .तिरंगी लढतीत त्यांनी हा विजय मिळवला.राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच, काँग्रेसचे चार व भारतीय जनता पक्षाचे दोन सदस्य निवडून आले. केंदळखुर्द सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवाजी गोविंद शेजुळ हे दुरंगी लढतीत विजयी झाले.येथे ग्रामपंचायतची  सत्ता अपक्ष सदस्यांकडे गेली आहे. खडांबे खुर्द ग्रामपंचायत सत्तांतर होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरपंच अण्णा दामोदर माळी हे विजयी झाले. तिरंगी लढतीत त्यांनी हा विजय मिळवला .विरोधकांना एका एका जागेवर समाधान मानावे लागले.पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती  बाळासाहेब लटके यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीने भाजप आघाडी चा पराभव केला.

        तुळापूर ग्रामपंचायत दादासाहेब रावसाहेब हारदे विजयी झाले. दुरंगी लढतीत त्यांनी हा विजय मिळवला.

       //सोनगाव ग्रामपंचायत//

लोकनियुक्त सरपंच विजयी उमेदवार-अलका सुभाष शिंदे(१३०५मते) पराभूत भारती किरण अंत्रे (१०५३ मते)

विजयी सदस्य-पाराजी मोहन धनवट, अकला रोहिदास कानडे, सुनिता संजय कानडे, एजाज शौकत तांबोळी, अश्विनी सचिन धनवट, जयश्री विनोद अंत्रे, राजन अशोक ब्राम्हणे, शबनम रहेमान पिंजारी, महेंद्र केशव अनाप, गणेश कारभारी अनाप पुजा उत्तम अनाप

            //कोंढवड ग्रामपंचायत //

लोकनियुक्त सरपंच- अर्जुन पाटीलबा म्हसे(९७९ मते) मधुकर रामदास म्हसे (४०० मते) विजयी सदस्य-दादासाहेब नामदेव म्हसे, प्रतिक्षा सुनिल म्हसे, उज्वला पोपट औटी, बजरंग विश्वनाथ म्हसे, रोहिणी प्रकाश नवले, सोनाली अनिल म्हसे, राकेश दत्तात्रय म्हसे, किशोर नानासाहेब म्हसे, वंदना संंभाजी शेजवळ

         //मांजरी ग्रामपंचायत//

 लोकनिुयक्त सरपंच-लताबाई जालिंदर आंबडकर (१७२४ मते)राणी अनिल पोळ (७७८) विजयी सदस्य – पोपट गोपीनाथ माळी, तुषार बाबासाहेब विटनोर, मंगल धनराज विटनोर, राजेंद्र रावसाहेब बिडगर, हौासाहेब विठ्ठल विटनोर, मंदा सागर जाटे, कोंंडीराम तुकाराम विटनोर, कांता दत्तात्रय विटनोर, विश्वनाथ त्रिंबक आंबडकर, वनिता संतोष विटनोर, विटनोर अर्चना सर्जेराव

         //खडांबे खुर्द ग्रामपंचायत//

 आण्णा दामोधर माळी (१०८१ मते) पराभूत लक्ष्मण भाऊसाहेब माळी (७६४ मते)

विजयी सदस्य- मोहन रंगनाथ खळेकर, अनशाबापू रामदास आवारे सोनाली केदारनाथ पवार, हरिश्चंद्रे किशोर धोंडिराम, प्रिया जॉनी पवार, रेणूका संदिप खळेकर, जयश्री अनिल साळवे, बेबी बाळासाहेब हरिश्चंद्रे, राजेंद्र केरू कल्हापूरे, हौसाबाई आण्णा माळी, सुनिल लक्ष्मण हरिश्चंद्रे

        //तुळापूर ग्रामपंचायत //

लोकनिुयक्त सरपंच – दादासाहेब सोपान हारदे (४८९ मते) पराभूत उमेदवार -दादासाहेब रावसाहेब हारदे (३७३)

विजयी सदस्य- देवराम लक्ष्मण हारदे, उषाताई सुभाष हारदे, विमल नामदेव हारदे, तेजस्वीनी माधव हारदे, सुनिल गोविंद हारदे, अंबादास वेणूनाथ हारदे, अरूणा अंबादास हारदे

        //आरडगाव ग्रामपंचायत//

– लोकनिुयक्त सरपंच सुरेखा रविंद्र म्हसे (१३०३ मते)  पराभूत उमेदवार स्मिता सुनिल मोरे(९७६) धनश्री अनिल जाधव(५१४)

विजयी उमेदवार – निलेश मच्छिंद्र जगधने, पल्लवी नितिन काळे, लिलाबाई सुरेश झुगे, जाधव सुमन राजेंद्र, स्वाती किशोर गागरे, उत्तम रावसाहेब वने, मनिषा ज्ञानदेव जाधव, मंदाबाई दिलीप म्हसे, सुरेंद्र राजेंद्र जाधव, सचिन अरविंद खुरूद, संगिता नंदकुमार तांबे

           //ताहाराबाद ग्रामपंचायत//

लोकनियुक्त सरपंच निवृत्ती विठ्ठल घनदाट (१५१४ मते) पराभूत उमेदवार घनदाट गणेश दामोधर (७३५मते) विजयी उमेदवार- मंगेश सुधाकर विधाटे (बिनविरोध) सोनाली बापु जगताप(बिनविरोध) गणपत सोन्याबापू झावरे, लक्ष्मीबाई भाऊसाहेब गांगड, संगिता पंढरीनाथ दाते, दादासाहेब शिवाजी बर्डे, तुकाराम आनंदा माळवदे, संजीवनी रामदास हारदे, जालिंदर चंद्रभान मुंडे, चिलाबाई दत्तु गांगड, आशा नानााहेब नालकर

            //ब्राम्हणगाव भांड//

 बिनविरोध लोकनियुक्त सरपंच – सविता राजेंद्र पवार

बिनविरोध सदस्य-भानुदास बबन माळी, अनिता संजय साळवे, रोहिणी सोमनाथ काळे, रविंद्र रमेश वारूळे, शशिकला चंद्रकांत देवकर विजयी उमेदवार- उत्कर्षा रविंद्र राजुळे, पुष्पा जालिंदर काळे

           //कोल्हार खुर्द ग्रामपंचायत//

लोकनिुयुक्त सरपंच अनिता दिंगबर पाटील (१७८३ मते) पराभूत उमेदवार कमल भाऊसाहेब लोंढे (१५६० मते)

विजयी उमेदवार-दिग्विजय अनिल शिरसाठ, विमल रत्नाकर भोसले, सुवर्णा बापुसाहेब लोखंडे, गोपीनाथ सावळेराम दळे, भिमा राजेंद्र  पवार(बिनविरोध) रूपाली संतोष पाटील, दिलीप सखाहरी कानडे, प्रकाश भाऊसाहेब शिरसाठ, स्वाती संदिप बनकर, संदिप विजय भोसले, भारती सदानंद शिरसाठ, सविता दत्तात्रय लोंढे, दिगंबर भाऊसाहेब शिरसाठ, राजू कारभारी वर्पे, ज्योती दीपक शिरसाठ

             //केंदळ खुर्द ग्रामपंचायत//

लोकनिुयुक्त सरपंच शिवाजी गोविंद शेजूळ (६६५ मते) पराभूत उमेदवार चंद्रकांत शिवाजी शेलार (५३२ मते)

बिनविरोध सदस्य- भिकुबाई प्रकाश जाधव, लताबाई राजू मगर, अनिता अशोक आढाव, सखाराम केरू जाधव, मनिषा शिवाजी आढाव, जनार्दन रंगनाथ आढाव, रत्नमाला प्रकाश आढाव, सोनाली संदिप आढाव, अनिता अनिल आढाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here