कोपरगांव दि. 20 डिसेंबर 2022
कोपरगांव विधानसभा मतदार संघातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १८ डिसेंबर रोजी झाल्या त्याची मतमोजणी २० डिसेंबर रोजी झाली त्यात भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांचे १२५ ग्रामपंचायत सदस्य दणदणीत मतांनी विजयी झाले तर १६ ग्रामपंचायत जनतेतून सरपंच पदावर कोल्हे गटाचा वरचष्मा राहिला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेतून पाय उतार झाली त्यानंतर सगळी सत्ता सुत्रे शिंदे-फडणवीस यांच्या हातात आली. त्यामुळे गाव पातळीवरील विकास कामांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जानून घेत जास्तीचा निधी कोपरगांव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतींना थेट उपलब्ध करून दिला आहे. “
११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुर मुंबई समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. त्यात कोपरगांव तालुक्यातील ११ गावांतील लाभार्थी, शेतकरी, आदिना मोठा फायदा झाला आहे.
गेल्या अडीच वर्षात फक्त पोकळ घोषणा कोपरगांव तालुक्यात ऐकायला मिळाल्या. आमदारांनी कुठल्याही समस्यांची सोडवणुक न करता फक्त एक हजार कोटी रुपयांची पोकळ घोषणा केली, मतदारसंघातील सगळे प्रश्न तसेच प्रलंबीत राहिले आहेत.
जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी थेट जनतेतून सरपंच पदाचे निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करून २६ ग्रामपंचायतीपैकी १६ ग्रामपंचायतीवर भाजपाप्रणित कोल्हे गटाचे वर्चस्व निर्माण करण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्यांना ताकद दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री आदीस्तरावर या २६ गावंचे प्रलंबीत प्रस्ताव मार्गी लावणेसाठी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मंत्रालय मुंबई स्तरावर पाठपुरावा करून बैठका घेतल्या.
कोपरगांव विधानसभा मतदार संघात शिंगनापुर, खिर्डीगणेश, देर्डे कोऱ्हाळे, बहादराबाद खोपडी, सोनेवाडी, धारणगांव, करंजी, तळेगांवमळे यासह अन्य ग्रामपंचायत निवडणुकीवर लक्षकेंद्रीत करून विजयश्री खेचून आणण्यात भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता ताई कोल्हे यांनी जाणिवपूर्वक प्रयत्न केले.
विकासाचा थेट निधी येत असल्याने जनतेतून सरपंचपदाला विशेष महत्व आहे. राज्यात शिंदे फडणवीस यांची सत्ता असल्याने गांवपातळीची सत्ताही आपलीच रहावी हा प्रयत्न जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केला त्याला मतदारांनी चांगलीच साथ दिली आहे.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सर्व नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचे अभिनंदन करून गांव विकासासाठी सर्वांनी मतभेद मिटवून एक व्हावे असे आवाहन केले आहे.