सातारा : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील विविध संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.
संत गाडगे महाराज समाज सेवा संस्था यांच्यावतीने संस्थेच्या कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भजन-किर्तनाने भाविकांनी अभिवादन केले.वधू वर पालक परिचय मेळावा संपन्न झाला होता. त्याची पुस्तिका देखील ज्यांनी आपली नावे वधू वर मेळाव्यात नोंदवली होती त्यांना मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आली. दरम्यान, परिसर स्वच्छता मोहीम संत गाडगेबाबा मठाजवळ ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.याशिवाय,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विविध संघटनाच्यामाध्यमातून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्रशांत पोतदार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत व भन्ते दिंपकर यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुळ्याजवळ प्रतिमेस तर मठात पुतळ्यास राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.शाहिर श्रीरंग रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात अंतर्गत व बाह्य स्वच्छतेवर समाजप्रबोधन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत खंडाईत, अंनिसचे कार्यवाह ऍड. हौसेराव धुमाळ,प्रशांत पोतदार, प्रकाश खटावकर, डॉ.माने, दिलीप सावंत,ऍड. विलास वहागावकर, आबासाहेब दणाने आदी मान्यवर यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणासह शाहिर श्रीरंग रणदिवे यांनी पहाडी आवाजातील पोवाडे गाऊन अभिवादन केले.अनिल वीर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. नंदकुमार काळे यांनी आभार मानले. सदरच्या कार्यक्रमास ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते रमेश इंजे, युवराज कांबळे,नारायण जावळीकर, मधुसुदन काळे, गणेश कारंडे, अजित कांबळे, अंकुश धाइंजे, गाल्फाडे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, तालुक्यातील सरपंच निवडणुकीतील विजयी नवनिर्वाचित सरपंच व सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.